नवी दिल्ली : जर तुम्ही रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळले असाल आणि तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर IRCTC ने एक खास पॅकेज आणले आहे. याद्वारे तुम्हाला ईशान्य भारतात परवडणाऱ्या दरात फिरण्याची संधी मिळेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) पर्यटकांसाठी अनेकदा उत्तम ऑफर आणते. यावेळी, IRCTC च्या पर्यटन पॅकेज अंतर्गत, तुम्हाला ईशान्य भारतातील एक अतिशय सुंदर राज्य अरुणाचल प्रदेशला भेट देण्याची संधी आहे.
अरुणाचल प्रदेशातील एक सुंदर दृश्य अरुणाचल प्रदेशातील एक सुंदर मंदिर अरुणाचल प्रदेशातील सुंदर डोंगररांगा अरुणाचल प्रदेश निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध : भारताच्या ईशान्येला वसलेले अरुणाचल प्रदेश हे राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात, आणि येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. आता IRCTC ने अरुणाचल प्रदेशचे टूर पॅकेज आणले आहे. ज्याचे नाव आहे, Arunachal - Gateway To Serenity Ex Guwahati. हे टूर पॅकेज 1 सप्टेंबरपासून गुवाहाटी येथून सुरू होत आहे.
अरुणाचल प्रदेशातील बर्फाने वेढलेले डोंगर अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिद्ध मूर्ती अरुणाचल प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य पॅकेजमध्ये 'या' सुविधा मिळतील : IRCTC च्या अरुणाचल प्रदेश टूर पॅकेजमधील संपूर्ण प्रवास 7 रात्री आणि 8 दिवसांचा असेल. यामध्ये तुम्हाला अरुणाचल प्रदेशातील तेजपूर, भालुकपाँग, दिरांग, तवान आणि बोमडिला या भागांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. तसेच तुम्हाला सर्वत्र फिरण्यासाठी वातानुकूलित बस आणि कॅबची सुविधा मिळेल. यासोबतच हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची (नाश्ता + रात्रीचे जेवण) व्यवस्थाही IRCTC कडून केली जाईल. 1 सप्टेंरपासून तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अरुणाचल प्रदेशाचे सौंदर्य अरुणाचल प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य असे करा बुक पॅकेज : या पॅकेजमध्ये सर्व प्रवाशांना प्रवास विम्याचाही लाभ मिळणार आहे. एकट्याने प्रवास करण्यासाठी 44,900 रुपये, दोन लोकांसाठी प्रतिव्यक्ती 33,370 रुपये आणि तीन लोकांसाठी प्रतिव्यक्ती 30,930 रुपये मोजावे लागतील. तुम्ही हे पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com किंवा http://tinyurl.com/EGH038 ला भेट देऊन बुक करू शकता. या टूर पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही 8595936696 आणि 8595936716 या क्रमांकावर संपर्कही साधू शकता.
अरुणाचल प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य
हेही वाचा :
- UPI In Sri Lanka : आता श्रीलंकेतही करता येणार UPI द्वारे पेमेंट, दोन देशांमध्ये झाला सामंजस्य करार