कच्छ (गुजरात) Rann Utsav Tour Package :गुजरातच्याजगप्रसिद्ध कच्छ रणोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवासाठी विविध टूर ऑपरेटर अनेक आकर्षक पॅकेजेस अरेंज करतात. भारतीय रेल्वेनं देखील कच्छ रणोत्सवासाठी 'व्हाईट डेझर्ट रिसॉर्ट' नावाचं टूर पॅकेज जाहीर केलंय. ५ दिवस ४ रात्रीचं हे पॅकेज पौर्णिमेच्या रात्री पांढऱ्या वाळवंटाच्या सौंदर्याचा लाभ पर्यटकांना व्हावा या उद्देशानं तयार करण्यात आलं आहे.
मुंबईहून सुरुवात : या ५ दिवस ४ रात्रीच्या पॅकेजला मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवरून सुरुवात होते. पर्यटकांना मुंबईहून गुजरातच्या भुजला सेकंड क्लास एसी गाड्यांमधून नेलं जाईल. तर भुजहून रणोत्सवासाठी बसद्वारे नेण्यात येईल. पर्यटकांना रणोत्सवाच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंट सिटीचा प्रीमियम टेंट उपलब्ध असेल. याशिवाय पर्यटकांना नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही दिलं जाईल.
प्रवास विम्याची विशेष सुविधा : पर्यटकांना इतर ठिकाणी जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध असेल. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना प्रवास विम्याची विशेष सुविधा देण्यात आली आहे. हे टूर पॅकेज २४ डिसेंबर २०२३ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना रणोत्सवातील सर्व उपक्रमांचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये कच्छच्या कला, कारागिरांची सर्जनशीलता, कच्छचं लोकसंगीत आणि विविध सादरीकरणे यांचा समावेश आहे.
टूर पॅकेजची किंमत : आयआरसीटीसीच्या या विशेष टूर पॅकेजसाठी प्रति व्यक्ती ३८,४८५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. कपल टूर पॅकेज बुक केल्यास प्रति व्यक्ती २४,९७५ रुपये, ३ जणांनी टूर पॅकेज बुक केल्यास प्रति व्यक्ती २३,००० रुपये आणि ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १९,०५५ रुपये शुल्क आकारलं जाईल. आयआरसीटीसीनं या शुल्कामध्ये पार्किंग शुल्क, टोल शुल्क आणि जीएसटीचा समावेश केला आहे.
हेही वाचा :
- Holiday Package Fraud: 'हॉलिडे पॅकेज'च्या नावाखाली हुश्शार पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना; कंपनीकडून 'नो रिस्पॉन्स'