महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IRCTC Ooty Tour Package : आयआरसीटीसीचे अत्यंत माफक दरात हे पॅकेज, प्रियजनांना घेऊन करू शकता पर्यटन - चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन

उटी ट्रॅव्हल पॅकेजचे भाडे खूपच कमी आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधाही मिळत आहेत. तुम्ही एकट्याने किंवा तुमच्या प्रियजनांसोबत ऊटीला भेट देऊ शकता. IRCTC च्या उटी टूर पॅकेजची ( IRCTC Ooty Tour Package ) संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहोत ते जाणून घ्या.

IRCTC Ooty Tour Package
IRCTC Ooty Tour Package

By

Published : Oct 27, 2022, 1:05 PM IST

नवी दिल्ली :अनेकांना प्रवासाची आवड असते. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह सहलीचे नियोजन करत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आला आहे. देशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांना कमी पैशात परदेशात सहज प्रवास करता यावा यासाठी रेल्वे उत्तम टूर पॅकेज देत आहे. उटी ट्रॅव्हल पॅकेजचे भाडे खूपच कमी आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधाही मिळत आहेत. तुम्ही एकट्याने किंवा तुमच्या प्रियजनांसोबत ऊटीला भेट देऊ शकता. IRCTC च्या उटी टूर पॅकेजची ( IRCTC Ooty Tour Package ) संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहोत ते जाणून घ्या.

चेन्नई-उटी-मदुराई :जर तुम्हाला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उटीला जायचे असेल, तर IRCTC चे उत्तम टूर पॅकेज तुमच्या कामाचे आहे. 'चेन्नई-उटी-मदुराई' असे या टूर पॅकेजचे नाव आहे. हे टूर पॅकेज ४ रात्री आणि ५ दिवसांचे आहे. ज्यामध्ये उटीच्या सुंदर दऱ्या, उद्याने, संग्रहालये आणि शहराची सैर केली जाणार ( Explore beautiful Nature ) आहे. यादरम्यान तुम्हाला अनेक सुविधाही मिळतील.

उटीला रेल्वे कधी जाणार :चेन्नई-उटी-मदुराई टूर पॅकेज अंतर्गत, तुम्ही ऑक्टोबर महिन्यात चार रात्री आणि पाच दिवसांच्या सहलीला जाऊ शकता. ऑक्टोंबरपासून या पॅकेजला सुरूवात झाली ( Ooty Tour Package In October ) आहे. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून ( Chennai Central Railway Station ) प्रवासी ट्रेन निघेल. त्यानंतर दर गुरुवारी प्रवासी या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकतात.

IRCTC कुठे फिरणार? : या टूर पॅकेजमध्ये, तुम्ही पहिल्या दिवशी चेन्नईहून निलगिरी एक्सप्रेसने प्रवास सुरू कराल, रात्री ९.५ वाजता ट्रेन चेन्नईहून निघेल. दुसऱ्या दिवशी मेट्टुपालयम रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांना उटीला नेले जाईल. उटीमध्ये, त्यांना दोडाबेट्टा पीक, टी म्युझियम, उटी सिटी, तलाव आणि बोटॅनिकल गार्डनला भेट पर्यटक भेट देऊ शकतात. तिसऱ्या दिवशी प्रवाशांना पिकारा धबधबा, तलाव, मदुमलाई वन्यजीव अभयारण्य येथील एलिफंट कॅम्प आणि जंगल राइडचा आनंद घेता येणार आहे. चौथ्या दिवशी कुन्नूरमध्ये सिम्स पार्क, लॅम्ब्स रॉक आणि डॉल्फिन नोजचा आनंद घेचा येईल. त्यानंतर निलगिरी एक्सप्रेसने प्रवाशांच्या परतीचा प्रवास होणार आहे.

उटी टूर पॅकेजचे भाडे : या टूर पॅकेजचे भाडे फक्त 9680 रुपये आहे. थर्ड एसी ट्रेनने प्रवास, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि स्थानिक ठिकाणी भेट देण्यासाठी बस आणि लोकल कारची सुविधा दिली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details