महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रेल्वेच्या आयआरसीटीच्या अ‍ॅपचं काम ठप्प, तिकिट बुकिंग होत नसल्यानं नागरिक हैराण - रेल्वेचे ई तिकीट सेवा

irctc app down today रेल्वेचे ई-तिकीट सेवा तात्पुरत्या काळासाठी ठप्प झाले आहे. त्यावर तांत्रिक टीम काम करत असल्याचं रेल्वेनं म्हटले आहे.

irctc app down today
irctc app down today

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 12:33 PM IST

Updated : Nov 23, 2023, 1:05 PM IST

irctc app down नवी दिल्ली- रेल्वे तिकीट बुकिंगसाठी लाखो प्रवाशी रेल्वेच्या आयआरसीटीसी अ‍ॅपवर अवलंबून असतात. मात्र, या अ‍ॅपमध्ये तांत्रिक कारणामुळे त्रुटी आली आहे. त्यामुळे तिकिट बुक करणे, रद्द करणे या सेवा तात्पुरत्या बंद आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आयआरसीटीनं आपल्या एक्स हँडलवरून पोस्ट करत करून तांत्रिक समस्येची माहिती दिली आहे.

आयआरसीटीनं पोस्टमध्ये म्हटलं की , 'तांत्रिक समस्येमुळे आयआरसीटीसीची ई-तिकीट सेवा तात्पुरत्या काळासाठी खंडित झाली आहे. त्यावर आमची तांत्रिक टीम काम करत आहे. तिकीट रद्द करणं आणि इतर माहितीसाठी कन्फर्म या कंपनीकडून कस्टमर केअरचे मोबाईल क्रमांक शेअर केले आहेत.

  • रेल्वे तिकीट बुक करायचे असताना अ‍ॅप डाऊन असले तरी चिंता करण्याची गरज नाही. आयआरसीटीसी अ‍ॅप बंद असले तरी तुम्ही इतर अ‍ॅप वापरून रेल्वेचं तिकीट बुक करू शकता. चला, अशा अ‍ॅपबद्दल माहिती घेऊ..

या अ‍ॅपचा आहे पर्याय

  • IRCTC व्यतिरिक्त इक्सिगो ( Ixigo) हा रेल्वे तिकीट बुकिंगसाठी चांगला पर्याय आहे. रेल्वेसंदर्भात तिकिट आरक्षित करणे व पीएनआरची माहिती तुम्हाला येथं मिळू शकते.
  • मेक माय ट्रिप ही 'ट्रिप प्लॅनिंग'साठीचे अ‍ॅप आहे. त्याच्या मदतीने तुम्ही बस, फ्लाइट आणि रेल्वेचे तिकिटे बुक करू शकता. त्याचबरोबर हॉटेल आणि कॅब देखील बुक करू शकता.
  • ट्रेनमॅन अ‍ॅपच्या मदतीनंही तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. त्याचबरोबर पीएनआरही चेक करू शकता.

परवडणारे दर असल्यानं नागरिकांची रेल्वेला पसंती-कामानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या आणि दूरवरचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना भारतीय रेल्वेचा प्रवास सर्वाधिक भरवशाचा आणि परवडणारा वाटतो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेची सेवा घेतात. अलीकडच्या काळात ऑनलाईन किंवा अ‍ॅप पमधून तिकीट बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. या सेवेमुळे वेळेवर आणि घरबसल्या तिकीट बुक करता येते. मात्र, अनेकदा रेल्वेचे तिकीट कन्फर्म होत नाही किंवा वेटिंग करावे लागते. अशा परिस्थितीत अ‍ॅपची सेवा खंडित झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप होत आहे.

हेही वाचा-

  1. महामुकाबल्यासाठी भारतीय रेल्वेही सज्ज! अहमदाबादसाठी धावणार तीन 'वर्ल्डकप स्पेशल' ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
  2. कच्छच्या जगप्रसिद्ध रणोत्सवाचा आनंद घ्यायचाय? IRCTC ने तुमच्यासाठी आणलं 'हे' खास टूर पॅकेज
  3. IRCTC Tour Package : पावसाळ्यात सुट्टीचा प्लॅन करताय? रेल्वेने आणले खास पॅकेज
Last Updated : Nov 23, 2023, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details