अजमेर (राजस्थान): जिल्ह्यातील गांधीनगर पोलिस स्टेशन परिसरात IPS प्रदीप मोहन शर्मा यांच्या कारला अपघात IPS car crashes in Ajmer झाला. त्यामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अजमेर-जयपूर महामार्गाजवळील बजरंग कॉलनी परिसरात सोमवारी हा अपघात झाला. आयपीएस प्रदीप मोहन शर्मा सोमवारी अजमेरहून जयपूरला परतत होते, असे सांगण्यात आले. elderly woman dies in accident in Ajmer
IPS Car Crashed: आयपीएस अधिकाऱ्याच्या कारला राजस्थानमध्ये अपघात.. वृद्ध महिलेचा मृत्यू - हादसे में बुजुर्ग महिला की मौत
सोमवारी, IPS प्रदीप मोहन शर्मा यांच्या कारचा अपघात झाला IPS car crashes in Ajmer. त्यामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर आयपीएस प्रदीप मोहन शर्मा किरकोळ जखमी झाले आहेत. elderly woman dies in accident in Ajmer
त्याचवेळी गांधी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. तर आयपीएस प्रदीप मोहन शर्मा किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वृद्ध महिलेला मार्बल सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. त्यानंतर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घटनेनंतर मृताचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले.इथे पोलिसांनी अपघातग्रस्त कार सोबत पोलीस ठाण्यात नेली. IPS शर्मा सध्या हादी रानी महिला बटालियन, अजमेरमध्ये कमांडंट म्हणून कार्यरत आहेत.