बेंगळुरू (कर्नाटक): सार्वजनिकपणे वाद निर्माण करणाऱ्या आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी रूपा यांची कर्नाटक राज्य सरकारने बदली केली आहे. दोघींनाही अद्याप पर्यंत कोणताही विभाग देण्यात आलेला नाही. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर उघडपणे एकमेकांवर टीका करून अनुशासनहीनता केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकारही दोन्ही अधिकाऱ्यांवर संतापले होते.
नवीन अधिकाऱ्यांच्या केल्या नियुक्त्या:कालच सरकारने दोन्ही महिला अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. आता हिंदू धार्मिक एंडॉवमेंट विभागाच्या आयुक्त रोहिणी सिंधुरी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कौशल्य विकास, उद्योग आणि उपजीविका विभागाचे सहसचिव बसवराजेंद्र यांची त्या पदावर बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य हस्तकला विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी रूपा यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डी.भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस पतीचीही बदली: सरकारने डी. रूपा यांचे पती मुनीष मौदगिल यांची कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली केली आहे. ते सर्वेक्षण सेटलमेंट आणि भूमी अभिलेख आयुक्त या पदावर कार्यरत होते. सीएन श्रीधर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत कारवाईचा इशारा दिला होता.