मुंबई : आयपीएलचे सामने हे यावर्षी फक्त महाराष्ट्रातच भरवण्यात येणार ( IPL 2022 In Maharashtra ) आहेत. मुंबई आणि पुण्यातील काही मैदानांवरच ( Cricket Stadium In Mumbai Pune ) होणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( Board of Control for Cricket in India ) वरिष्ठ सूत्रांनी एएनआयला दिली आहे.
IPL 2022 : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर.. आयपीएलचे सामने भारतातच खेळवले जाणार पण.. - क्रिकेट क्लब ऑफ इंडिया
क्रिकेटप्रेमींसाठी आज महत्वाची बातमी आली आहे. आयपीएलचे सामने हे भारतातच भरवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ( Cricket Stadium In Mumbai Pune ) या दोन शहरात हे सामने ( IPL 2022 In Maharashtra ) होतील. मात्र हे सामने प्रेक्षकांविनाच होणार आहेत.
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर.. आयपीएलचे सामने भारतातच खेळवले जाणार पण..
गर्दीशिवाय होणार सामने
एएनआयला बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दीशिवाय हे सामने घेण्यात येणार आहेत. मुंबईमधील वानखेडे स्टेडियम ( Wankhede Stadium ), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ( Cricket Club of India ) आणि डिवाय पाटील स्टेडियममध्ये ( DY Patil Stadium ) हे सामने भरविण्यात येणार आहेत. गरज पडल्यास पुण्यातील स्टेडिअममध्येही ( Cricket Stadium In Pune ) हे सामने भरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.