मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मीडिया हक्कांचा तीन दिवस चाललेला लिलाव ( IPL Media Rights Auction ) मंगळवारी संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले की, आयपीएल 2023-27 साठीचे टीव्ही हक्क स्टार डिजिटल राइट्स वायाकॉम (रिलायन्स) कडे असतील. पाच वर्षांसाठी एकूण चार पॅकेजेसची बोली सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर (48,390 कोटी) पोहोचली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनीही ट्विट करून वायाकॉमचे अभिनंदन केले असून लिलावात बोली लावणाऱ्यांचे आभार मानले आहेत. जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'वायकॉम-18 ने 23758 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. भारताने डिजिटल क्रांती पाहिली आहे आणि या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. डिजिटलने आपला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, म्हणूनच खेळाच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.
वायाकॉम-18 ने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंग्डमचे हक्कही विकत घेतल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे. टाइम्स इंटरनेटने मेना (मध्य पूर्व) आणि अमेरिकेचे सर्व हक्क विकत घेतले आहेत, तर टाईम्सकडे इतर देशांचेही हक्क असतील. बीसीसीआय सचिव म्हणाले की, जगभरातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे अव्वल दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळेल.
जय शाह यांनी लिहिले की, या लिलावात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, बीसीसीआय आपल्या बाजूने सर्वतोपरी मदत आणि समर्थन करेल. या लिलावातून बीसीसीआयला जे काही उत्पन्न मिळेल ते देशांतर्गत क्रिकेटची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी वापरली जाईल. जेणेकरून चाहत्यांना क्रिकेट पाहण्याचा आनंद घेता येईल. जय शाह पुढे म्हणाले की, आता राज्य संघटना, आयपीएल फ्रँचायझींनी एकत्र येण्याची आणि चाहत्यांना आयपीएलचा उत्तम अनुभव देण्याची वेळ आली आहे.
कोणाला काय मिळाले?
आयपीएल 2023-27 मीडिया अधिकार एकूण बोली – 48390 कोटी