महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IPL Auction 2022: क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात.. लागली 'इतक्या' रकमेची बोली - आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन अपडेट

आयपीएल लिलावाच्या ( IPL auction 2022 ) दुसऱ्या दिवशी अनेक नवीन खेळाडूंवर बोली लावण्यात आल्या. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर ( Cricketer Sachin Tendulkar ) याचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघाने ३० लाखांची बोली लावून खरेदी केले ( Arjun Tendulkar bought by Mumbai Indians ) आहे.

अर्जुन तेंडुलकर
अर्जुन तेंडुलकर

By

Published : Feb 13, 2022, 9:30 PM IST

हैदराबाद : क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा ( Cricketer Sachin Tendulkar ) मुलगा अर्जुन तेंडुलकर याला आयपीएल खेळाडूंच्या लिलावात ( IPL auction 2022 ) मुंबई इंडियन्स संघाने ३० लाख रुपयांना विकत घेतले आहे. सलग दुसऱ्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतले आहे. त्याची बेस प्राईज २० लाख रुपये होती. मात्र गुजरात टायटन्स संघाने जास्त बोली लावली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने त्यापेक्षा जास्त बोली लावत त्याला विकत ( Arjun Tendulkar bought by Mumbai Indians ) घेतले.

२०२१ मधेही केले होते खरेदी

अर्जुन याला इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा संघात सामील करून घेतले आहे. अर्जुनला सलग दुसऱ्या सत्रात ३० लाखांची बोली लावून मुंबई इंडियन्सने विकत घेतले आहे. 2021 च्या हंगामाच्या लिलावातही मुंबईने या अष्टपैलू खेळाडूला मूळ किमतीत खरेदी केले होते.

आकाश अंबानींनी लावली बोली

आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरच्या नावाची घोषणा होताच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी बोली लावायला सुरुवात केली. यात गुजरात टायटन्सने जास्त रकमेची बोली लावली. त्यानंतर मुंबईने पुन्हा खेळी करत अर्जुनाची किंमत वाढवली. यावर गुजरात छावणीने काही काळ विचार केला आणि नंतर पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. बोली निश्चित होताच लिलाव सभागृहात हशा पिकला होता.

अष्टपैलू खेळाडू

अर्जुन तेंडुलकर हा एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामात प्रथमच आयपीएल लिलावात दिसलेल्या अर्जुनला मुंबई इंडियन्सने त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन खरेदी केले. मात्र, तो आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही आणि दुखापतीमुळे त्याला टूर्नामेंटमधूनच बाहेर पडावे लागले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details