नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर ( Gangster ) सतींद्रजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार आणि अतिरेकी ( Terrorist ) हरविंदरसिंग संधू उर्फ रिंडा याला यांना इंटरपोलने ( Interpol ) रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे. रिंडा हा दहशतवादी बनण्यापूर्वी कुख्यात गँगस्टर होता. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा गोल्डी ब्रार याच्यावर आरोप आहे. गायक मुसेवाला याच्या हत्येमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली होती. गोल्डी ब्रार कॅनडा तर रिंडा हा पाकिस्तानातून आपल्या कारवाया करीत असल्याचा संशय आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या खालिस्तान समर्थक बब्बर खालसा संघटनेसाठी रिंडा काम करीत होता. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी सनन्वय साधून तो आपले काम करीत होता, असही या अधिकाऱ्याने सांगितले.
Red Corner Notice against Rinda : दहशतवादी रिंडाला इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी, भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू
कुख्यात गँगस्टर ( Gangster ) सतींद्रजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार आणि अतिरेकी ( Terrorist ) हरविंदरसिंग संधू उर्फ रिंडा याला यांना इंटरपोलने ( Interpol ) रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. रिंडा हा दहशतवादी बनण्यापूर्वी कुख्यात गँगस्टर होता. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला ( Singer Sidhu Muse Wala ) याच्या हत्येचा गोल्डी ब्रार याच्यावर आरोप आहे.
भारतात प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू होणार - सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर या दोघांचे भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सीआयएच्या नवाशहर येथील इमारतीवर 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्या रिंडाने केल्याचा संशय आहे. पंजाबी गायक मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या गोल्डीवर गुरुवारी इंटरपोलिस रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील प्रस्ताव गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून पाठविला जाणार असून सीबीआयचे संपर्क अधिकारी इंटरपोलसोबत समन्वय साधून पुढील कार्यवाही करतील. श्री मुक्तसर साहिब येथील मूळनिवासी असलेला ब्रार हा विद्यार्थी म्हणून व्हिसा घेत 2017 कॅनडाला गेला होता. तो लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रीय सदस्य आहे. कॅनडावरूच तो आपले कामकाज बघत असे. सीबीआयने गुरुवारी ब्रारविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याच्या विनंतीसंदर्भातील अहवालावर स्पष्टीकरण दिले.
रेड कॉर्नर नोटीसचा प्रस्ताव आधीच पाठवला होता - बुधवारी पंजाब पोलिसांनी सांगितले की, 19 मे 2022 रोजी, सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या दहा दिवस आधी त्यांनी गोल्डी ब्रारविरुद्ध रेड-कॉर्नर नोटीस जारी करण्याचा प्रस्ताव आधीच सीबीआयकडे पाठवला होता. ज्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होईल. सध्याच्या गोल्डीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचा प्रस्ताव 30 मे रोजी दुपारी 12.55 वाजता पंजाब बोलिसांना इमेलद्वारे प्राप्त झाला. 30 मे रोजीच्या या ई-मेलमध्ये 19 मे रोजीच्या पत्राची प्रत जोडण्यात आली होती.