नवी दिल्ली - योग दिवस प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. सन 2015 पासूनच, जागतिक स्तरावर उत्सव साजरा करण्यास सुरवात केली गेली. चांगल्या आरोग्यासाठी योग करणे खूप महत्वाचे आहे. योग हा शब्द संस्कृतमधील आहे. योगाचा इतिहास हा हजारो वर्ष जुना असल्याचे म्हटलं जातं. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय योग फेडरेशनच्या माहितीनुसार सध्या जगभरात 300 दशलक्ष लोक योगाभ्यास किंवा योगासने करतात. यंदा योग दिनाच्या पार्श्वभूमीवर काही योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाची थीम काय?
यावर्षी आपण सातवा योग दिवस साजरा करत आहोत. दरवर्षी योग दिनासाठी एक विशेष विषय (थीम) नेमण्यात येतो. यावर्षीच्या योग दिनाचा विषय आहे, 'योग फॉर वेलनेस'. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा विषय निवडण्यात आला आहे. यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामधून पंतप्रधान सकाळी साडेसहा वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींनी मांडली योग दिनाची संकल्पना -
27 सप्टेंबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मनःशांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारिरीक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे, असे ते म्हणाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
पहिला योग दिवस -