महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जागतिक महिला दिन : आजच्या दिवशी देशभरातील संरक्षित स्मारकांमध्ये महिलांना विनामूल्य प्रवेश

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशभरातील महिलांना एक भेट दिली आहे. आज देशभरातील संरक्षित स्मारकांमध्ये महिलांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन

By

Published : Mar 8, 2021, 1:46 PM IST

नवी दिल्ली - दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. 1908 मध्ये पहिल्यांदा महिला दिन साजरा केला गेला होता. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशभरातील महिलांना एक भेट दिली आहे. आज देशभरातील संरक्षित स्मारकांमध्ये महिलांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. एएसआयचे सहसंचालक एम नंबीराजन यांनी हा आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी भारतीय आणि विदेशी महिला पर्यटकांना सर्व संरक्षित स्मारके आणि पुरातत्व साइटवर विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. एएसआय अंतर्गत केंद्र सरकारने संरक्षित केलेली 3,691 स्मारके आहेत. सोमवारी ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमीनार, सूर्य मंदिर, एलोरा लेणी, खजुराहो आणि अजिंठा लेणी अशा स्मारकांमध्ये महिलांसाठी मोफत प्रवेश असेल.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा मुख्य उद्देश लोकांना महिलांच्या सन्मान आणि हक्कांबद्दल जागरूक करणे आहे. कार्यालये, शाळा, सरकारी संस्था इत्यादी ठिकाणीही महिलांचा या दिवशी सन्मान केला जातो. देशभरात विविध ठिकाणीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 'Women in leadership: an equal future in a COVID-19 world' ही यावर्षीच्या महिला दिनाची थीम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details