सुरत (गुजरात) -तुम्ही चहाचे विविध प्रकार ऐकले, पाहिले किंवा प्यायलेही असाल. गुजरातच्या सुरतमध्ये एक किलो चहाची 5 लाख रुपये किलो दराने विकला जातो. विशेष म्हणजे त्याच्या पानांपासून बनवलेल्या एका कप चहाची किंमत 250 रुपये आहे. या चहाच्या पानाचा वापर सौंदर्य उत्पादनांमध्येही केला जातो. आज (दि. 21 मे ) आंतरराष्ट्रीय चहा दिन ( International Tea Day 2022 ) यानिमित्ताने आपण या चहाबाबत जाणून घेऊयात.
या चहाच्या किंमतीवरून अंदाज लावता येतो की त्यात काही ना काही वैशिष्ट्ये नक्कीच असतील. साधारण चहाची कमीत कमी किंमत दहा रुपये असते. पण, या ठिकाणच्या एक कप चहाची किंमत तब्बल 250 रुपये इतकी आहे. यासंदर्भात चहा विक्रेते आशिष यांनी सांगितले की, या चहाच्या पानाचा वापर सौंदर्य उत्पादनांमध्येही केला जातो. ते म्हणाले, शरीराचे वजन कमी करण्यासाठी लोक खूप पैसे खर्च करतात. पण, हा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर हा चहा दातांमध्ये असलेल्या विषाणूशी लढण्यासही मदत करतो.