जयपूर : संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपणे ही कोणत्याही देशाची गरज आहे. त्यामुळेच आपल्याला संस्कृती आणि परंपरेतून विकासाचा योग्य मार्ग सापडू शकतो. त्यामुळेच जगभरातील देश आपली संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भूतकाळातील आठवणींचे अवशेष, कलाकृती संग्रहालयात जतन करतात. त्यामुळे संग्रहालय म्हणजे आगामी पिढ्यांसाठी भूतकाळातील आठवणींशी जोडणारा पूल असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करुन देतो. भारतात आपल्या परंपरेचे अवशेष जतन करणारी अनेक संग्रहालये आहेत. त्यातील जयपूर येथील आम्रपाली संग्रहालयात जगातील सगळ्यात मोठ्या ज्वेलरींचा खजिना आहे. त्यामुळे जाणून घेऊया संग्रहालय दिनामिनित्त जयपूरच्या आम्रपाली संग्रहालयातील खजिन्याबाबातची माहिती.
आम्रपाली संग्रहालयात चार हजार प्रकारचे दागिने :राजस्थानची राजधानी जयपूर येथील सी स्कीममध्ये असलेल्या आम्रपाली संग्रहालयात पारंपरिक भारतीय कला आणि चांदी-सोन्याच्या दागिन्यांचा जगातील सर्वात मोठा संग्रह सापडला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व दागिने या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयात सुमारे चार हजार प्रकारचे दागिने ठेवण्यात आले आहेत. देवदत्त पटनायक लिखित 'द अॅडॉर्नमेंट ऑफ गॉड्स' या पुस्तकाचेही शनिवारी संध्याकाळी प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक आम्रपाली संग्रहालयाच्या संग्रहातील 50 ललित कला वस्तू आणि त्यांच्याशी संबंधित कथांवर आधारित आहे.
प्रतीके हे सामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्याचे माध्यम आहे. ज्यांना तुमची भाषा माहित नाही अशा लोकांपर्यंत कल्पना पोहोचवण्यास मदत होते. कारण भूगोलात प्रवास करण्याची ताकद प्रतीकांमध्ये असते. आम्रपाली संग्रहालय भारतीय दागिने आणि रत्नांनी जडलेल्या वस्तूंना समर्पित आहे - देवदत्त पटनायक, लेखक
सोन्याचांदीच्या दागिन्यांचा सर्वात मोठा संग्रह :आम्रपाली संग्रहालयात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा संग्रह ठेवण्यात आल्याची माहिती या संग्रहालयाचे संस्थापक राजीव अरोरा यांनी सांगितले आहे. संपूर्ण जगात पारंपरिक भारतीय कला आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांचा सर्वात मोठा संग्रह या संग्रहालयात आहे. या पुस्तकात देवदत्त पटनायक यांनी भारताची सभ्यता आणि संस्कृती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूरमध्ये आलेल्या कोणत्याही पर्यटकाला भारतातील दागिने आणि कला यातून भारताची सभ्यता आणि संस्कृती समजू शकते. मी 40 वर्षांपासून देशभर फिरलो आहे. उत्तर ते पश्चिम, पूर्व ते दक्षिण, डोक्यापासून पायापर्यंत सर्व दागिन्यांच्या वस्तू या संग्रहालयात आहेत. संग्रहालयात 4 हजार प्रकारचे दागिने ठेवण्यात आल्याचे त्यांनी यावळी सांगितले आहे.