नवी दिल्ली13 ऑगस्ट हा दिवस डाव्या हाताच्या लोकांसाठी खास असतो. उजव्या हाताच्या जगात डाव्या हाताच्या लोकांच्या संघर्षाबद्दल जागरुकता World Left Handers Day निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आज आंतरराष्ट्रीय डाव्या International Left Handers Day हाताचा दिवस आहे. अमिताभ बच्चन, बिल गेट्स, रजनीकांत, सचिन तेंडुलकर, रतन टाटा हे सगळे डावे आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल हा खरा तर उजवा हाताने खेळाचा मात्र, खेळाच्या फायद्यासाठी तो डाव्या हाताने खेळायला शिकला.
1992 मध्ये सुरुवात या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व: 1992 मध्ये, 13 ऑगस्ट रोजी, लेफ्ट हॅन्डर्स क्लबने डाव्या लोकांच्या समस्या, वैशिष्ट्यांबद्दल त्यांना जागरूक करण्यासाठी प्रथम डाव्या हातांचा दिवस साजरा केला. तथापि, काही लोकांचा असा विश्वास आहे की, डीन आर कॅम्पबेलने 1976 मध्येच याची सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस घोषित करण्यामागचा उद्देश न्यूनगंड दूर करणे. डाव्या हातांमुळे चेष्टेचा सामना करणार्या लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा होता.
सुमारे 10-12 टक्के लोकसंख्या डाव्या हाताचीआहे सेरेब्रल डोमिनन्स द बायोलॉजिकल फाउंडेशन या शैक्षणिक पुस्तकात प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की. उजव्या हाताच्या लोकांपेक्षा डाव्या हाताच्या लोकांना ऍलर्जीचा धोका 11 पट जास्त असतो. 2007 च्या अभ्यासानुसार, 'विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या स्तरावर परिणाम होतो. उजव्या हाताच्या लोकांपेक्षा डावखुऱ्यांचा बुद्ध्यांक जास्त असण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये डाव्या हाताच्या आणि लिंगावरील अभ्यासात असे दिसून आले आहे की 23% अधिक पुरुष महिलांपेक्षा डावखुरे आहेत.