महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

International Kite Festival 2023 : अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उद्घाटन, पाहा Photos - अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 (International Kite Festival 2023) चे गुजरातच्या अहमदाबादमध्ये उद्घाटन झाले आहे. (International Kite Festival started in Ahmedabad). या वर्षीच्या पतंग महोत्सवाची थीम 'वसुधैव कुटुंबकम' वर आधारित आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामुळे गुजरातमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

International Kite Festival 2023
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023

By

Published : Jan 8, 2023, 5:05 PM IST

अहमदाबाद : अहमदाबादमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 (International Kite Festival 2023) शहरातील साबरमती रिव्हरफ्रंट येथे आयोजित करण्यात आला आहे. (International Kite Festival started in Ahmedabad). या फेस्टिवलचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षांपासून पतंग महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. तथापि, यावेळी जगातील 68 देशांतील 126 पतंग उडवणारे आणि भारतातील 14 राज्यांतील 65 पतंग उडवणारे या पतंग महोत्सवात सहभागी झाले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हवेत पतंग उडवून महोत्सवाची सुरुवात केली. (International Kite Festival pictures).

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023

'वसुधैव कुटुंबकम' वर आधारित थीम : या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची थीम 'वसुधैव कुटुंबकम' वर आधारित आहे. यावेळी संबोधित करताना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी आपले पारंपरिक लोकप्रिय सण लोकसहभागाने साजरे करण्याची नवी परंपरा सुरु केली आहे. दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये पतंगांचा व्यापार फक्त आठ ते दहा कोटी रुपयांचा होता. पण आता मात्र देशातील पतंग उद्योगातील 40 टक्के वाटा एकट्या गुजरातचा आहे, जो 625 कोटी रुपयांचा आहे. पतंग उद्योगात सुमारे 1 लाख 30 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023

68 देशांतील पतंग उडवणाऱ्यांचा सहभाग : रिव्हरफ्रंट येथे आयोजित पतंग महोत्सवात भारतातील 14 राज्यातील 65 पतंग उडवणारे सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, रशिया, जर्मनी, ग्रीस, इस्रायल, इजिप्त, कोलंबिया, डेन्मार्क, न्यूझीलंड, इंडोनेशिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, श्रीलंका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, नेपाळ आदी देशांतील 126 पतंग उडवणाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच, गुजरातमधील विविध जिल्ह्यांतील 660 हून अधिक पतंग उडवणारे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023

गुजरातमध्ये परदेशी पर्यटकांची रेलचेल : यंदा वडोदरा, वडनगर, सोमनाथ, राजकोट, धोलेरा आणि घोर्डोसह अहमदाबादमध्ये पतंग महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामुळे गुजरातमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. रिव्हरफ्रंटवर होणाऱ्या पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्याचबरोबर वेगवेगळे स्टॉल्स उभारून अनेक छोट्या व्यापाऱ्यांनाही आपले उत्पन्न व रोजगार मिळून त्यांचा व्यवसाय व रोजगार वाढतो.

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023

ABOUT THE AUTHOR

...view details