हैदराबाद - जगभरात ऑगस्टमधील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. भारतातही अनेक राष्ट्रांमध्ये फ्रेंडशिप डे याच दिवशी साजरा केला जातो (International Friendship Day 2022). यावर्षी फ्रेंडशिप डे 7 ऑगस्ट रोजी येत आहे. जगभरात मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये इतरही तारखांना फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो.
फ्रेंडशिप डेचा इतिहास: पहिल्या-वहिल्या फ्रेंडशिप डेची कल्पना ही खूपच जुनी आहे. हॉलमार्क कार्ड्स, इंकचे संस्थापक जॉयस हॉल यांनी 2 ऑगस्ट 1930 रोजी पहिल्यांदी ही फ्रेंडशिप डेची संकल्पना मांडली. त्याआधी, ग्रीटिंग कार्ड नॅशनल असोसिएशनने 1920 मध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनचा वापर करून अशा कार्डांच्या विक्रीला चालना देण्यासाठी मार्केटिंग करण्यास सुरुवात केली होती. या संकल्पनेला त्यांनी चांगलीच चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ग्रीटिंग कार्ड्सच्या माध्यमातून मात्र ही कल्पना फलद्रूप झाली नाही.
मैत्रीदिनाचे महत्व - संयुक्त राष्ट्रांच्या मते आंतरराष्ट्रीय मैत्री दिन जागतिक शांतता आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यास हातभार लावू शकतो. गरिबी, हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन हे केवळ काही अडचणी, संकटे आणि जागतिक शांतता, सुरक्षा, विकास आणि सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण करणारे घटक आहेत. मानवी एकतेच्या भावनेचा प्रचार आणि समर्थन करणे, जे अनेक मार्गांनी केले जाते. परंतु त्यासाठी सर्वात मूलभूत मैत्रीची संकल्पना आहे. ज्या माध्यमतून हे सर्व साध्य करता येते.
मैत्री ही सर्वच प्रसंगात गरजेची - संकटांची आणि आव्हानांची मूळ कारणे शोधून त्याचा गुंता सोडवण्यासाठी मैत्री आवश्यक आहे. त्यासाठी मैत्रिदिनाचे वेगळे वैशिष्ठ्य आहे. काही नाती अशी असतात त्यातून सगळेच गुंते किंवा प्रश्न सुटतातच असे नाही. मात्र मैत्रीच्या नात्याने अनेक प्रश्न सोडण्यास मदत होते. तेच साध्य करण्याचा किंवा त्याची आठवण ठेवण्याचा हा दिवस मैत्री दिवस.
जगभरातील मैत्रीदिनाची विविधता - मैत्री दिन जसा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो तसा काही देशात वेगळ्या दिवशीही मैत्रीदिन साजरा केला जातो. इक्वाडोर, एस्टोनिया, फिनलंड, मेक्सिको, व्हेनेझुएला आणि डोमिनिकन रिपब्लिक यासारख्या राष्ट्रांमध्ये, व्हॅलेंटाईन डे आणि फ्रेंडशिप डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आफ्रिकेत फ्रेंडशिप डे 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो, तर युक्रेनियन लोक 9 जून रोजी मैत्रीदिन साजरा करतात. हा दिवस जगभरात अनेक तारखांना साजरा केला जातो.