महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

International Day Of Worlds Indigenous People 2023 : जागतिक आदिवासी दिन का करण्यात येतो साजरा? काय आहे महत्व आणि इतिहास - जागतिक आदिवासी दिवस 2023

आज जगभरात जागतिक आदिवासी दिन 2023 ( International Day Of Worlds Indigenous People 2023 ) साजरा करण्यात येतो. भारतात 2011 च्या लोकसंख्येनुसार तब्बल 9 टक्के आदिवासी नागरिक आहेत. तर महाराष्ट्रात आदिवासी नागरिकांची संख्या 1 कोटी 5 लाखापेक्षा जास्त आहे.

International Day Of Worlds Indigenous People 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 9, 2023, 10:49 AM IST

हैदराबाद : जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी आदिवासी समुदाय आपल्या प्राणाची बाजी लावतात. भारतात आलेल्या द्रविड आणि इंडो- आर्य नागरिकांच्या अगोदरपासून आदिवासी येथील रहिवाशी होते. त्यामुळे आदिवासी समुदायाला मूलनिवासी समुदाय म्हणूनही संबोधले जाते. आदिवासी समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांनी केलेल्या समर्पण, त्यागाचा सन्मान करण्यासाठी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

काय आहे आदिवासी दिनाचा इतिहास :आदिवासी समुदायाने जल, जमीन आणि जंगलासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. आजही देशातील 9 टक्के आदिवासी बांधव जंगलात मोठ्या हालअपेष्ठाना तोंड देत आहेत. त्यामुळे आदिवासी समुदायाचा विकास आणि त्यांना तोंड द्यावा लागणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जिनिव्हा येथे 1982 मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यगटाची मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणावरील उपआयोगाची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत आदिवासी समुदायातील नागरिकांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. त्याला मान्यता म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने 1993 मध्ये 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. त्याची सुरुवात 1994 पासून करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

काय आहे जागतिक आदिवासी दिनाचे महत्व :सिंधू संसकृतीच्या ऱ्हासानंतर आजचे अनेक आदिवासी समुदाय उदयास आल्याचा दावा समाजशास्त्रज्ञ करतात. आज आदिवासी समुदाय मोठ्या अडचणींचा सामना करतात. मात्र या आदिवासी समुदायाने यापूर्वी शिकार करुन आपली उपजिविका बागवली आहे. या जमाती स्वातंत्र्य उपभोगत होत्या, मात्र या आदिवासी समुदायाला जंगलात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारदरबारी आदिवासी समुदायासाठी जागतिक आदिवासी दिन साजरा करुन जनजागृती करण्यात येते. आदिवासी समुदायाला असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात. त्यातही आदिवासी दिनाचे औचित्य साधून त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा घडून येते. त्यामुळे जागतिक आदिवासी दिनाचे मोठे महत्व आहे.

संग्रहित छायाचित्र

राज्यात कुठे आहेत आदिवासी जमाती :देशात आदिवासी समुदायाची संख्या तब्बल 9 टक्के आहे. तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 11 कोटी 23 लाख इतकी आहे. त्यात आदिवासी नागरिकांची लोकसंख्या तब्बल 1 कोटी 5 लाख इतकी आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदुरबार, पालघर, धुळे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, आदी आदिवासी बहुल भागात हे नागरिक मोठ्या अडचणींना तोंड देत आपली उपजिविका भागवत आहेत. महाराष्ट्रात तब्बल 47 आदिवासी जमाती राहतात. यात भिल्ल, कोरकू, गोंड, आंध, माडिया, कोलाम, पावरा, कोकणा, गावीत, वारली, कातकरी आदी आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळून येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details