महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे अंतरिम सरकार स्थापन, अली अहमद जलाली सत्तेत येण्याची शक्यता - अली अहमद जलाली

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी राजीनामा दिला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, अली अहमद जलाली यांची नवीन अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Ali Ahmed Jalali
अली अहमद जलाली

By

Published : Aug 15, 2021, 8:46 PM IST

Updated : Aug 16, 2021, 4:42 AM IST

काबूल :तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अराजकता आणि बिघडलेल्या परिस्थितीमुळे रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला आहे. अशरफ गनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सरकारने इस्लामी अतिरेक्यांना शरण आल्यानंतर अली अहमद जलाली यांना नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अली अहमद जलाली?

देशाचे माजी गृहमंत्री अली अहमद जलाली अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. अली अहमद जलाली नवीन सरकारचे अंतरिम प्रमुख म्हणून निवडले जाऊ शकतात. त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले. ते अफगाणिस्तान सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. जलाली यांनी जर्मनीमध्ये अफगाणिस्तानचे माजी राजदूत म्हणूनही काम केले आहे. अफगाण सुरक्षा दलावर महिनाभर चाललेल्या हल्ल्यानंतर तालिबान या इस्लामिक संघटनेशी संबंधित दहशतवादी अखेर रविवारी (१५ ऑगस्ट) काबूलच्या वेशीवर पोहोचले.

अली अहमद जलाली यांचा जन्म काबूलमध्ये झाला होता. परंतु 1987 पासून ते अमेरिकन नागरिक होते आणि मेरीलँडमध्ये राहत होते. 2003 मध्ये जलाली अफगाणिस्तानात परतले आणि तत्कालीन बदलत्या सरकारमध्ये त्यांना गृहमंत्री बनवण्यात आले. जलाली जानेवारी 2003 ते सप्टेंबर 2005 पर्यंत अफगाणिस्तानचे माजी गृहमंत्री होते. जलाली लष्करात माजी कर्नलही राहिले आहेत. सोव्हिएत हल्ल्यादरम्यान पेशावर येथील अफगाण प्रतिरोध मुख्यालयात ते एक उच्च सल्लागार होते.

तर, आंतरिक आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे कार्यवाह अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, की 'काबूलचे लोक सुरक्षित राहतील. कारण ते आंतरराष्ट्रीय मित्रांसह शहराचे रक्षण करत आहेत. काबूलवर हल्ला होणार नाही'. तसेच, मिर्झाकवाल यांनी काबूलमधील रहिवाशांना आश्वासन दिले आहे, की सुरक्षा दल शहराची सुरक्षा सुनिश्चित करेल.

यापूर्वी अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की सत्ता हस्तांतरणाच्या तयारीसाठी तालिबानचे वाटाघाटी करणारे राष्ट्रपतींच्या निवासस्थानी जात आहेत.

तर, एका अधिकाऱ्याने रविवारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या बैठकीचा उद्देश शांततापूर्ण पद्धतीने तालिबानला सत्ता सोपवणे आहे. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे, की त्यांनी बळजबरीने सत्ता हस्तगत करण्याचा विचार केला नाही.

तालिबानच्या हल्ल्यादरम्यान चर्चा सुरू आहे- गनी

याआधी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी शनिवारी (14 ऑगस्ट) सांगितले, की 'मी 20 वर्षांची "कामगिरी" वाया जाऊ देणार नाहीत. तालिबानच्या हल्ल्यादरम्यान "सल्लामसलत" सुरू आहे'. दरम्यान, त्यांनी शनिवारी दूरदर्शनद्वारे राष्ट्राला संबोधित केले. दरम्यान, तालिबानने अलीकडच्या दिवसात प्रमुख क्षेत्रांवर कब्जा केल्यानंतर प्रथमच ते सर्वांसमोर आल्याचे दिसले.

ते म्हणाले, की 'आम्ही सरकारचे अनुभवी नेते, समाजाच्या विविध स्तरांचे प्रतिनिधी आणि आमचे आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्याशी सल्लामसलत सुरू केली आहे'. दरम्यान, त्यांनी अधिक माहिती दिली नाही. परंतु लवकरच आपल्याला निर्णयाची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अफगाण तालिबानच्या ताब्यात जाणार?

अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील बऱ्याच भागांवर कब्जा केला आहे. आता ते राजधानी काबूलपासून फक्त 11 किलोमीटर दक्षिणेस सरकारी सैन्याशी लढत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सर्व बाजूंनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी तालिबानला आक्रमकता थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफागाणिस्तानच्या शेजारी देशांना आपल्या सीमा निर्वासितांसाठी खुल्या ठेवण्याचा आग्रह केला आहे.

तालिबाननं अफगाणच्या 23 शहरांवर ताबा मिळवला?

अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांपैकी एक असलेले नांगरहार प्रांतातील जलालाबाद शहर हेही अफगाणिस्तान सरकारच्या हातून निसटले आहे. आता फक्त प्रमुख शहर काबूल सरकारकडे उरले आहे. अफगाणिस्तानला पाकिस्तानशी जोडणारा मुख्य रस्ता जलालाबादमधून जातो. हा मार्ग आता तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबाननं आता अफगाणिस्तानातील 34 पैकी 23 प्रांतीय राजधान्यांवर नियंत्रण मिळवलं असल्याचं समजत आहे. मोठ्या शहरांपैकी केवळ काबूलच अफगाण सरकारच्या नियंत्रणात आहे. त्यावरही तालिबान कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे.

अमेरिका सर्व सैन्य मागे घेणार

पाश्चिमात्य देशांच्या पाठीशी असलेल्या गनी सरकारच्या अस्तित्वावर अमेरिकेने प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय, अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत देशातून आपली शेवटची लष्करी तुकडी मागे घेणार आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने 20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात प्रवेश केला होता.

अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 'तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीच्या दक्षिणेला एक प्रांत काबीज केला आहे. शिवाय, शनिवारी पहाटे उत्तरेकडील एका प्रमुख शहरावरही तालिबानने हल्ला केला, ज्याचे संरक्षण माजी शक्तिशाली छत्रपांकडून केला जात आहे.

कोण आहे तालिबान?

अफगाणिस्तानात तालिबानचा उदय 90 च्या दशकात झाला. सोव्हिएत सैन्य परत आल्यानंतर तेथे अराजकाचे वातावरण निर्माण झाले, ज्याचा फायदा तालिबानने घेतला. त्यानंतर लगेच तालिबानने दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानातून आपला प्रभाव वाढवला. सप्टेंबर 1995 मध्ये तालिबानने इराणच्या सीमेला लागून असलेला हेरात प्रांत काबीज केला. 1996 मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून काढून काबूलवर कब्जा केला होता.

तालिबानच्या अटी

यानंतर तालिबान्यांनी इस्लामी कायद्याची कडक अंमलबजावणी केली. म्हणजे, पुरुषांना दाढी वाढवणे आणि स्त्रियांना बुरखा घालणे बंधनकारक करण्यात आले. सिनेमा, संगीत आणि मुलींच्या शिक्षणावर बंदी होती. तालिबान्यांनी बामियानमधील युनेस्को संरक्षित बुद्ध पुतळ्याची तोडफोड केली.

2001 मध्ये 9/11 हल्ला झाला, तेव्हा तालिबान अमेरिकेच्या निशाण्याखाली आले. अल कायद्याचा ओसामा बिन लादेन याला आश्रय दिल्यामुळे अमेरिकेने तालिबानवर हल्ला केला. जवळपास 20 वर्षे अमेरिका तालिबानशी लढली. 1 मे पासून अमेरिकन सैन्याने तेथून माघार घेण्यास सुरुवात केली. 11 सप्टेंबर 2021 पर्यंत अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार येणार आहे. दरम्यान, अशीही भीती आहे की या नंतर ISI आणि तालिबान भारताच्या प्रकल्पाला आणखी लक्ष्य करतील.

हेही वाचा-'राज्य सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?' 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

Last Updated : Aug 16, 2021, 4:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details