नवी दिल्ली:ओडिशा येथील बालासोर मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 261 प्रवाश्यांनी जीव गमावला आहे. तर 900 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तरीही मृतांची संख्या अजून वाढू शकते. रेल्वेने अपघातात मरण पावलेल्या लोकांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे; पण तुम्हाला माहीत आहे की, आयआरसीटीसी केवळ 35 पैसे प्रति यात्रीप्रमाणे 10 लाख रुपये इंश्योरेंसची सुविधा प्रदान करते. त्याच्या अंतर्गत अपघातामध्ये वेगवेगळ्या पात्रतेच्या हिशेबाने मृताच्या कुटुंबीयांना मदत रक्कम दिली जाते. यासाठी तिकीट बुकिंग करताना ट्रॅवल इन्शुरन्सचा पर्याय आवर्जून निवडावा.
प्रवास विमा कसा निवडावा?ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी IRCTC द्वारे ऑनलाइन तिकीट बुक करताना रेल्वे प्रवास विमा पर्याय दिला जातो. पण अनेकदा लोक या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच तिकीट बुक करताना विमा पर्याय निवडणे आवश्यक आहे. तुम्ही हा पर्याय निवडल्यास तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करून, ही वेबसाइट उघडा आणि नॉमिनीचे तपशील जसे की नाव, मोबाइल नंबर, वय आणि नातेसंबंध भरा. असे केल्याने, कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास, नंतर पीडित प्रवासी किंवा नॉमिनी या विमा पॉलिसीचा दावा करू शकतील.
किती क्लेम आला हे जाणून घ्या:रेल्वे प्रवास विमा असल्यामुळे, प्रवासादरम्यान कोणताही अपघात झाल्यास, रेल्वे अपघातात प्रवाशाचे झालेले नुकसान विमा कंपनीकडून भरपाई स्वरूपात मिळते. मात्र, अपघातात प्रवाशाच्या नुकसानीनुसार विम्याची रक्कम उपलब्ध आहे. रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम म्हणून 10 लाख रुपये दिले जातात. एवढेच नाही तर अपघातात रेल्वे प्रवासी पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला विमा कंपनीकडून 10 लाख रुपयेही दिले जातात.
विमा असणे आवश्यक:अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रु. 7.5 लाख आणि रुग्णालयाचा खर्च म्हणून जखमी झाल्यास रु. 2 लाख दिले जातात. रेल्वे अपघात झाल्यास जखमी व्यक्ती, नॉमिनी किंवा त्याचा वारसदार विम्याचा दावा करू शकतात. रेल्वे अपघातानंतर चार महिन्यांच्या आत विम्याचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विमा दावा दाखल करून तुमची विम्याची रक्कम मिळवू शकता.
हेही वाचा:
- Sharad Pawar Reaction: ओडिशा रेल्वे अपघाताबाबत शरद पवारांचे मोठे विधान, इतिहासातील 'त्या' घटनेची करून दिली आठवण
- Odisha Train Accident : काळा आला होता पण वेळ नव्हती; ओडिशा ट्रेन दुर्घटनेत बाचवले एकाच कुटुंब तिन्ही सदस्य, सांगितली घटनेची आपबीती
- Train Tragedy Live Update : दोन्ही पॅसेंजर गाड्यांचे इंजिन चालक आणि गार्ड चमत्कारिकरित्या बचावले-रेले विभागाची माहिती