डेहराडून: केदारनाथ जवळील गरुडचट्टी (garud chatti) येथे मंगळवारी आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरचा (aryan aviation helicopter) भीषण अपघात झाला. (Kedarnath Helicopter Crash). या अपघातात वैमानिकासह 7 यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले आहेत. जाणून घ्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वी आणि नंतर काय घडले ते सविस्तरपणे. अपघात एवढा भीषण होता की काही मृतदेह जागीच जळाले. अनेक मृतदेहांचे अवयव इकडे तिकडे विखुरले गेले. हेलिकॉप्टर अपघातापूर्वी आणि नंतर काय घडले ते सविस्तरपणे वाचा.
सकाळी 11.30 ला केदारनाथला रवाना: मंगळवारी सकाळी 11:30 वाजता हेलिकॉप्टरने गुप्तकाशीहून केदारनाथसाठी उड्डाण घेतले. हे हेलिकॉप्टर सकाळी 11.39 वाजता केदारनाथला पोहोचले. यात्रेकरूंना तेथे उतरवल्यानंतर हेलिकॉप्टर केदारनाथ येथे तीन मिनिटे थांबले. त्यानंतर 11:42 वाजता 6 यात्रेकरूंसह हेलिकॉप्टर गुप्तकाशीच्या दिशेने निघाले.
परतीच्या उड्डाणात एक मिनिटानंतर घडला अपघात: सकाळी 11.42 वाजता हेलिकॉप्टरने ६ यात्रेकरूंना घेऊन केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण घेतले. मात्र टेक-ऑफच्या एका मिनिटानंतर, म्हणजे 11:43 वाजता, केदारनाथ हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुडचट्टी देवदर्शनीजवळ हेलिकॉप्टरमध्ये मोठा स्फोट झाला. त्यानंतर हेलिकॉप्टर खड्ड्यात पडले. हेलिकॉप्टर निवृत्त ले. कर्नल अनिल कुमार हे उडवत होते. अनिल कुमार यांना ४८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. केदार व्हॅलीमध्येही ते 2018 पासून सातत्याने सेवा देत होते.
यांचा झाला मृत्यू: आर्यन कंपनीच्या या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांना आपला जीव गमवावा लागला. आर्मी एव्हिएशनचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल पायलट, जे हेलिकॉप्टर उडवत होते, ते मुंबईचे रहिवासी होते. बाबा केदारनाथच्या दर्शनानंतर परतणाऱ्या तामिळनाडू आणि गुजरातमधील सहा यात्रेकरूंचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. अपघातात एका दाम्पत्यासह पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.