नवी दिल्ली -मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत मजुरीचे काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. Eight Year Old Girl Raped दरम्यान, 18 ऑगस्ट रोजी यमुना खादर येथे गवत कापत असलेल्या दोन महिलांनी मुलीची माहिती दिली. पोलिस, फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
३६ वर्षीय कसाईला अटक पोस्टमार्टमनंतर डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे सांगितले. ओळख लपवण्यासाठी तीचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. Girl Murdered After Raped In Delhi डॉक्टरांनी सांगितले की, मुलीचा गळा ज्या पद्धतीने कापण्यात आला आहे, त्यावरून हे एखाद्या व्यावसायिकाचे काम असल्याचे दिसते. अपहरणाच्या एफआयआरमध्ये पोलिसांनी बलात्कार, हत्येसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. Raped Case In Delhi आरोपींचा शोध सुरू होता. परिसरातील रहिवासी असलेल्या ३६ वर्षीय कसाईला त्याच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली.