उत्तर प्रदेश (लखनऊ) -25 डिसेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात समाजवादी पक्षाने घेराव कार्यक्रम सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. भाजपाने शेतकर्यांचा नाश करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. भाजपची आर्थिक धोरणे कॉर्पोरेट व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत.
शेतकऱ्यांकडून शेत हिसकवण्याचे षडयंत्र-
अखिलेश यादव म्हणाले की, भाजप सरकार कंत्राटी शेतीच्या नावाखाली शेतकर्यांची शेती हिसकावू इच्छित आहे. भाजपने शेतकऱ्यांना जे काही आश्वासने दिली होती, ती एकसुद्धा पूर्ण केली नाहीत. भाजपच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा मागे घ्यावा. ना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे, ना उसाला पैसे दिले जात आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहेत.