हैदराबाद-कोरोना महामारीच्या संकटात जशी माणुसकीचे उदाहरणे समोर येत आहेत. तशीच माणुसकी संपली आहे का, असा प्रश्न पडावा, अशा घटनाही समोर येत आहेत. कारमधून नेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू होताच टॅक्सी चालकाने मृतदेह व मृताच्या पत्नीला भररस्त्यात सोडले. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम येथील टेक्काली येथे ही घटना घडली आहे.
भररस्त्यात कार चालकाने सोडून दिल्याने महिलेवर अत्यंत दयनीय परिस्थिती ओढवली. तिला पतीच्या मृतदेहासह काही तास मदतीसाठी टेक्काली शहरातील रस्त्यावर वाट पाहावी लागली. ही घटना घडल्याचे माहिती होताच स्थानिक पोलीस निरीक्षक कामेश्वर राव हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची विचारपूस केली.
हेही वाचा-चिंताजनक..! नागपुरात प्रोटेस्टंट ख्रिश्चन बांधवांना दफनविधीची जागा पडत आहे अपुरी