नवी दिल्ली :बहीण सतत तिच्या मित्रासोबत बोलत असते, म्हणून भावाने चिडून तिच्यावर गोळी चालवल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरात हा प्रकार घडला. या घटनेनंतर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अल्पवयीन भावाला (१७) अटक करण्यात आली आहे.
ती व्हॉट्सअॅपवर बोलत होती
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही मुलगी आपल्या मित्रासोबत व्हॉट्सअॅपवर बोलत असल्याचे तिच्या भावाने पाहिले. त्याने याआधीही संबंधित मित्रासोबत बोलण्यात बहिणीला मनाई केली होती. त्यामुळे, पुन्हा त्याच्यासोबत ती बोलताना दिसल्याने त्याचा पारा चढला. यानंतर दोघा भावंडांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, ज्यात मुलाने बंदूक उचलत आपल्या बहिणीला पोटात गोळी मारली. सध्या या बहिणीवर उपचार सुरू आहेत.