महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#JeeneDo : क्रौर्याची परिसीमा अन् हादरून टाकणाऱ्या देशातील बलात्काराच्या आजवरच्या घटना

महिलांवर व मुलींवरील बलात्काराच्या घटनांनी अनेकदा देशभरात लोकांनी आंदोलने केले आहेत. गोव्यामध्ये सागरी किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यानंतर बलात्कारांच्या हादरून टाकणाऱ्या आजवरच्या घटनांचे अनेकांना पुन्हा स्मरण होत आहे.

क्रौर्याची परिसीमा
क्रौर्याची परिसीमा

By

Published : Aug 3, 2021, 3:23 PM IST

हैदराबाद- गोव्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण उजेडात आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशात यापूर्वीही मुलींवर पाशवीपद्धतीने बलात्कार झाले आहेत. काही घटनांमध्ये तर पाशवीपणाच्या मर्यादाही ओलांडल्या होत्या, इतकी क्रुरता दिसून आली होती. त्यामुळे संपूर्ण देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मुलीवरील बलात्कारांच्या घटनानंतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. जाणून घ्या, अशा क्रुरतेचा कळस घडलेल्या बलात्काराच्या घटना.

दिल्लीमधील निर्भया प्रकरण

16 डिसेंबर 2021 ला दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. 6 आरोपींनी पीडिताच्या मित्राला मारहाण केली होती. त्यानंतर विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केले होते. आरोपींनी पीडिता आणि पीडिताच्या मित्राला धावत्या बसमधून बाहेर फेकून दिले होते. पीडितेला गंभीर अवस्थेत दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती सुधारली नसल्याने सिंगापूर येथे हलविण्यात आले. अखेर पीडिता ही जगण्याच्या लढाईत पराभूत झाली.

निर्भया प्रकरण

निर्भयाबरोबर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात मोर्चे काढण्यात आले. संसदेतही निर्भयाच्या मृत्यूचे पडसाद उमटले. पोलिसांनी 5 दिवसानंतर अल्पवयीन मुलासमेवत 6 आरोपींना अटक केली. जलदगती न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आरोपी रामसिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. तर उर्वरित 4 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. अल्पयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही जलदगती न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली. 20 मार्च 2020 रोजी आरोपी पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

जनेतेचे रस्त्यावर आंदोलन

हैदराबाद सामूहिक बलात्कार-

नोव्हेंबर 2019 मध्ये हैदराबादजवळ 26 वर्षीय पशूवैद्यकीय डॉक्टर दिशा यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 28 नोव्हेंबरला पीडितेचा मृतदेह हा बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आढळला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. लोक हे रस्त्यावर उतरले. पीडितेला न्याय द्यावा, अशी लोकांनी मागणी केली.

पोलिसांना तपासात सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यामध्ये पीडिता ही तोंडुपल्ली येथे स्कूटी लावत असल्याचे दिसले होते. आरोपींनी पीडितेच्या स्कूटरचे टायर पंक्चर केले. दिशाने जेव्हा स्कूटरचे टायर पंक्चर असल्याचे पाहिले, तेव्हा बहिणीला फोन केला. त्यानंतर आरोपींनी दिशाला मदत करू असे सांगत टोल प्लाझाजवळी झाडात पीडितेला नेले. आरोपींनी पीडितेचा फोन स्विच करून फेकून दिला होता. पोलिसांच्या माहितीनुसार चार जणांनी दिशावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह 27 किलोमीटर दूर नेऊन पेट्रोलने जाळला होता. 29 नोव्हेंबरला पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांचे वय 20 ते 24 वर्षे होते. न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविले. पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेले. तेव्हा चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एनकाउन्टर करत चारही जणांना ठार केले. या एनकाउन्टरनंतर हैदराबाद पोलिसांचे देशभरात कौतुक केले. लोकांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला.

उन्नाव बलात्कार प्रकरण

2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. हा आरोप आमदार कुलदीप सेंगर याच्यावर करण्यात आला. हा आमदार समाजवादी पक्षातून भाजपच्या तिकिटावर निवडणूल आला होता. एका आठवड्यानंतर पीडिता ही बेपत्ता झाली. पीडिताने पोलिसात तक्रार देऊनही तिची दखल घेण्यात आली नाही. पीडितेने न्यायालयात गेल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल केला. तरीही आरोपी मोकाट होते. दुसरीकडे पीडितेच्या नातेवाईकांना धमकीचे सत्र सुरू होते. सेंगर याने पीडितेचे आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. एप्रिल 2018 मध्ये आमदार कुलदीप सेंगरच्या भावाने पीडितेच्या भावाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात पीडितेच्या पित्याला मारहाण करण्यात आली.

उन्नाव बलात्कार प्रकरण

गंभीर जखमी झालेल्या पीडितेच्या पित्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेचे प्राण वाचले. मात्र, तिच्या पित्याचा मृत्यू झाला. निष्काळजीपणा दाखविल्याने पोलिसांचे निलंबन करण्यात आले. अतुल सेंगरला पीडितेच्या पित्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. हे प्रकरण उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयवर सोपविले आहे. त्यानंतरही पीडितेला धमक्या मिळत राहिल्या. उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर आमदार कुलदीप सेंगरला अटक करण्यात आली. या दरम्यान जुलै 2019 मध्ये एका ट्रकने कारला धडक दिली. या घटनेत पीडितेची काकी, बहिण यांचा मृत्यू झाला. तर वकील गंभीर जखमी झाले. दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर 16 डिसेंबर 2019 ला न्यायालयाने कुलदीप सेंगरवर अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरविले. सेंगरला न्यायालयाने 10 वर्षे तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा-जम्मू काश्मीर : बांदीपोरामध्ये सैन्यदल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, दहशतवादी ठार

कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरण

जानेवारी 2018 मध्ये जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील रसाना गावामध्ये 8 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले. मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची अत्यंत वाईट स्थिती करण्यात आली. पीडित मुलीला नशा आणणारे औषध देऊन पूजेच्या ठिकाणी बलात्कार केल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मुलीच्या पित्याने तक्रार दाखल केल्यानंतर मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मंदिराचे प्रभारीच्या पुतण्याला अटक केली. तेव्हा या प्रकरणाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू एकता मंचने आरोपीला समर्थन देत आंदोलन केले. तर भाजप आमदारानेही आरोपीला पाठिंबा दर्शविला.

पोलिसांनी 7 आरोपींवर गुन्हा दाखल केला. तर अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका समुदायाला गावातून बाहेर काढण्यासाठी हा बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 8 आरोपीमध्ये एक माजी महसूल अधिकारी, चार पोलीस कर्मचारी आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. दोन आरोपींवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप करण्यात आला. 10 जून 2019 रोजी न्यायालयाने साजीराम, प्रवेश कुमार उर्फ मन्नू आणि दीपक खजुरिया या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तिलक राज, आनंद दत्त आणि सुरिंदर कुमार यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली. विशाल नावाच्या आरोपीला न्यायालयाने दोषमुक्त केले.

हेही वाचा-CBSE 10TH RESULT आज निकाल जाहीर, या वेबसाईट्सवर बघा येईल तुमचा निकाल

हिमाचलमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण

4 जुलै 2017 रोजी शिमला जिल्ह्यातील कोटखाई येथील शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. 2 दिवसानंतर तिचा मृतदेह हा जंगलात आढळला. पोलीस तपासादरम्यान मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. सरकारने नेमलेल्या एसआयटीने 6 स्थानिक लोकांना अटक केली. यापैकी मूळ नेपाळचा असलेल्या सुरज या आरोपीचा मृत्यू झाला. तेव्हा लोक संतप्त झाले. मुलीला न्याय मिळावा, यासाठी लोक रस्त्यावर उतरले. तेव्हा हिमाचल प्रदेशने बलात्काराचे प्रकरण सीबीआयवर सोपविले.

हिमाचल प्रदेशातील मुलीवर बलात्कार झाल्यानंतर जनतेचे आंदोलन

सीबीआयने सूरज हत्याकांड प्रकरणात आयजी जहूर जैदीसहित 9 पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली. सीबीआय तपासात ठोस माहिती मिळाली नाही. सीबीआआयने अनिल कुमारला अटक केली. पुरावे असल्याने त्याला 18 जूनल 2021 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

प्रियदर्शिनी मट्टू

दिल्ली विद्यापीठाची विधी शाखेत शिकणाऱ्या प्रियदर्शिनीचा मृतदेह हा 23 जून 1996 ला तिच्या काकाच्या घरी मिळाला. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचे तपासात समोर आले. दिल्ली विद्यापीठातील शिकणारा संतोष सिंह याने एकतर्फी प्रेमप्रकरणातून तिच्यावर अत्याचार केले होते. तो आयपीएस अधिकाऱ्याचा मुलगा होता. नेहमी पाठलाग करणाऱ्या संतोष विरोधात प्रियदर्शिनीने तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. 1999 मध्ये न्यायालायने सबळ पुराव्याअभावी आरोपीची सुटका केली. तेव्हा लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दिल्ली उच्च न्यायालयाने संतोष कुमारला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. चार वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतरण केले.

विद्यार्थ्यांनी पीडितेसाठी केली होती आंदोलने

हेही वाचा-पेगासस प्रकरण : नितीश कुमारांच्या मागणीनंतर आतातरी मोदी सरकारने चौकशी करावी - संजय राऊत

अरुणा शानबाग

27 नोव्हेंबर 1973 मध्ये मुंबईच्या केईएम रुग्णालयात परिचारिका अरुणा शानबागवर रुग्णालयातील वॉर्डबॉयने बलात्कार केला. त्यानंतर साखळीने तिचा गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अरुणा ही कोममध्ये गेली. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आरोपी सोहनलालला अटक केली. बलात्काराची घटना सिद्ध होऊ शकली नाही. खुनाच्या प्रकरणात आरोपीला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

अरुणा शानबाग

रुग्णालयात दाखल झालेली अरुणाची श्रवणशक्ती क्षीण झाली. तिला पक्षाघात झाला. सुमारे 40 वर्षे अरुणा ही बेडवर निर्जीवासारखी पडून राहिली. तिची करुण कहाणी लिहिणाऱ्या लेखिका पिंकी विरानी यांनी तिच्या इच्छा मृत्यूची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने इच्छामृत्यूची परवानगी देण्यास नकार दिला. तेव्हा इच्छामृत्यूची खूप चर्चा झाली. 18 मे 2015 रोजी अरुणा शानबागचा मृत्यू झाला. 42 वर्षे कोमात राहणाऱ्या आयुष्याचा शेवट झाल्यानंतर तिचा संघर्षही संपला.

ABOUT THE AUTHOR

...view details