नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड संघाचा 8 विकेट्सने पराभव ( INDW beat ENGW by 8 wickets ) केला. प्रथम खेळताना इंग्लंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 विकेट गमावून 146 धावा केल्या. दुसऱ्या टी-20 सामन्यात स्मृती रंधावाने शानदार खेळी केली, ज्यामुळे भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
तसेच, याआधी पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला नऊ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ( England Won The Toss ) होता. इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 142 धावा केल्या होत्या. यजमानांकडून फ्रेया केम्पने ( Batsman Freya Kemp ) सर्वाधिक 51 धावा केल्या, तर मायिया बाउचियरने 34 धावांचे योगदान दिल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगला खेळ केला नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
शानदार सुरुवातीनंतर भारताने जिंकला सामना -