भोापाळ - मध्य प्रदेश पोलिसांचा नवा चेहरा समोर आला आहे.त्यामुळे विजय नगर पोलिसांचे ( Zomato boy story ) कौतुक होत आहे. पोलिसांनी जय हळदे नावाच्या डिलिव्हरी बॉयसाठी दुचाकी भेट दिली ज्याची सर्वत्र चर्चा आहे. झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी ( Zomato delivery boy ) कंपनीमध्ये सायकलवरून अन्न पोहोचवणारा 22 वर्षांचा मुलगा सायकलवरून घरोघरी पोहोचवित होता. त्याचा त्रास पाहून पोलिसांनी त्याला आर्थिक मदत करून मोटारसायकल मिळवून दिली.
देणग्या गोळा करून गिफ्ट बाईक ( gift to bike ) : विजय नगर पोलीस स्टेशनचे ( vijay Nagar police station ) प्रभारी तहजीब काझी यांनी सांगितले की, नुकत्याच रात्रीच्या गस्तीदरम्यान, त्यांनी जय हळदे नावाच्या घामाघूम झोमॅटो डिलिव्हरी बॉयला फूड पार्सल घेऊन जाताना पाहिले होते. त्यांच्याशी बोलले असता कळले की तो आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील असून त्याच्याकडे मोटारसायकल घेण्यासाठी पैसे नाहीत. या मुलाला पोलीस ठाण्यातून दुचाकी भेट देण्यात आली. डाऊन पेमेंटवर वाहन खरेदी केले. पोलिसांचे औदार्य पाहून अतिशय आनंदित झालेल्या डिलिव्हरी बॉयने बाईकचे उर्वरित हप्ते स्वतः जमा करण्याचे आश्वासनही पोलिसांना दिले.