महाराष्ट्र

maharashtra

इंदौर पोलिसांच्या महाराष्ट्रात धाडी; आणखी तीन आरोपींना अटक

By

Published : Jan 24, 2021, 5:35 PM IST

इंदौर पोलिसांनी रविवारी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील एक जण हा 1993 बॉम्ब हल्ल्यातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. तर दुसरा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी आहे. आतापर्यंत याप्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एमडीएमए ड्रग्स
एमडीएमए ड्रग्स

इंदौर -अमली पदार्थ तस्करांचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशातील इंदौर पोलीस महाराष्ट्रात धाडी टाकत आहेत. एमडीएमए या अमली पदार्थच्या तस्करी विरोधात इंदौर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. 21 जानेवरीला फिरोज आणि लाला या तस्करांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील एक जण हा 1993 बॉम्ब हल्ल्यातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. तर दुसरा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी आहे.

इंदौर पोलिसांकडून रविवारी आणखी तीन आरोपींना अटक

वसीम खान या आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. तो गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी आहे. या प्रकरणात तो निर्दोष सुटला होता. तर हुआ अय्यूब कुरैशीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. हा 1993 मधील मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपी होता. पाच वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला सोडण्यात आले आहे. सध्या तो मुंबईत काम करत होता. त्यांचा संबंध वेद प्रकाश, दिनेश अग्रवाल, सरदार यांच्याशी होते.

गुलशन कुमार हत्येप्रकरणी आरोपी असलेला वसीम खान हा अबू सालेम टोळीचा जुना सदस्य होता. तो सध्या नाशिकमध्ये राहत होता आणि त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी तपासाद्वारे वसीम खानचे आरोपी वेद प्रकाश, दिनेश अग्रवाल, सरदार खान आणि रायस यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले. या सर्व आरोपींच्या मागावर त्याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत 16 आरोपींना अटक -

वसीम खान अबू सालेम टोळीचा जूना सदस्य असल्याने ड्रग्ज तस्करांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिरोज आणि लाला टोळीचा मंदसौरमधील सरदार खानला इंदौर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इंदौरशिवाय इतर शहरांमध्ये ड्रग्सची तस्करी केली आहे. सरदार खानसाठी तस्कर रईस, कासिम आणि अशफाक काम करत होते. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असल्याचे एडीजी योगेश देशमुख यांनी सांगितले.

पोलिसांचे पथक गुजरात आणि महाराष्ट्रात -

अटक केलेल्या आरोपींच्या मागोमाग, उच्च अधिकाऱ्यांनी पोलिसांची विविध पथके गुजरात आणि महाराष्ट्रात पाठविली आहेत. लवकरच महाराष्ट्र आणि गुजरातमधील मोठ्या तस्करांना पोलीस पकडतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एखादा मोठा खुलासा देखील केला जाऊ शकतो. सद्यस्थितीत गुजरात आणि महाराष्ट्रातील पथके अमली पदार्थ तस्करांच्या निरनिराळ्या ठिकाणी छापा टाकत आहेत.

एमडीएमए ड्रग्स म्हणजे काय?

एमडीएमए औषधे मोठ्या प्रमाणात हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये घेतली जातात. त्याला 'पार्टी ड्रग्स' देखील म्हटले जाते. थोडक्यात त्याला एमडी म्हणतात. त्याची किंमत घेणाऱ्या व्यक्तीनुसार ठरविली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. एमडीएमए मिथायलीनडाइऑक्सी मेथाम्फेटामाइन ला एक्सटेसी असंही म्हटलं जातं. उत्साहीत करणं, भ्रामक स्थिती निर्माण करणं, उर्जा किंवा आराम वाटण्यसाठी या ड्रगचा वापर होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details