इंदूर(मध्य प्रदेश) - शहरात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ (Indore Love Jihad) होत आहे. या प्रकरणामध्ये एका पीडितेने लव्ह जिहादच्या प्रकरणाबाबत इंदूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने (Indore High Court) पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबी महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने 9 मुलांच्या बापाने आधी महिलेशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर धर्म बदलायला लावला आहे, असा आरोप पीडितेच्या वकिलांनी केला आहे. सध्या पीडितेच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने विजयनगर पोलीस ठाण्याला पीडितेने दिलेल्या निवेदनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अर्ज विचारात घेऊन कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
आरोपी 9 मुलांचा बाप - पीडितेचे वकील कृष्णकुमार कुमार यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. आरोपी मोहम्मद शाकीरने याचा फायदा घेतला आणि बँकेचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली त्या महिलेसोबत मैत्री केली. काही दिवसांनंतर शाकीर पीडितेच्या प्रेमात पडला. त्यानंतर आरोपीलने त्या महिलेला फिरायला घेऊन गेला होता. तिथे त्याने पीडितेला मादक पदार्थ पाजून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. त्यानंतर आरोपीने पीडितेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, याचा फायदा घेत आरोपी पीडितेला सतत घरी नेऊन तिचे शोषण करत असे. दरम्यान, एके दिवशी पीडितेला समजले की आरोपी एका विशिष्ट समाजाचा असून तो 9 मुलांचा बाप आहे.