भोपाळ :मध्य प्रदेशच्या इंदूरमधील प्रसिद्ध 'कॉम्प्युटर बाबा'च्या आश्रमावर कारवाई करण्यात आली आहे. या आश्रमाच्या अवैध बांधकामांवर इंदूर प्रशासनाने जेसीबी चालवले. याप्रकरणी प्रशासनाने कॉम्प्युटर बाबाला दोन महिन्यांपूर्वी नोटीस दिली होती. आश्रमाकडून त्यावर कोणतेही उत्तर न आल्याने प्रशासनाने कारवाई करत तब्बल ४६ एकर जागा मोकळी केली आहे.
लोकतंत्र बचाओ यात्रा..
कॉम्प्युटर बाबाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी २८ जागांवर लोकतंत्र बचाओ यात्रेचे आयोजन केले होते. या सर्व ठिकाणी एक प्रकारे भाजपाचा विरोध करत या यात्रा काढण्यात आल्या होत्या. कमलनाथ सरकारच्या काळात कॉम्प्युटर बाबाने नर्मदा नदीसाठीही बऱ्याच मोहिमा राबवल्या होत्या.