महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Indonesia Earthquake : इंडोनेशिया भूकंपाने हादरले, इमारती कोसळल्या, 162 जणांचा मृत्यू - जकार्ता येथे भूकंपाचे धक्के

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाच्या धक्क्याने ( Indonesia Earthquake ) मोठ्या इमारती कोसळल्या. आतापर्यंत 162 जणांच्या मृत्यू झाला आहे. ( Kills 162 And Injures Hundreds ) शेकडो लोक जखमी झाले आहेत.

Indonesia Earthquake
भूकंपात 162 ठार

By

Published : Nov 22, 2022, 7:44 AM IST

इंडोनेशिया : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाच्या धक्क्याने ( Indonesia Earthquake ) मोठ्या इमारती कोसळल्या. आतापर्यंत 162 जणांच्या मृत्यू झाला ( Kills 162 And Injures Hundreds ) आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.6 इतकी होती. तर आणखी मृतांचा आकडा वाढू शकतो. ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोक दबले गेले आहेत. भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कर्मचारी मंगळवारी घटनास्थळी पोहोचले आहे.

भूकंपामुळे इमारती कोसळल्या : भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रांतातील पर्वतीय भागातील सियांजूर शहराजवळ होता. सोमवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले आणि त्यांनी घरे सोडून रस्त्यावर आले. भूकंपामुळे इमारती कोसळल्या. सियांजूर येथील रुग्णालयाची पार्किंग रात्रभर पीडितांनी भरलेली होती. काहींवर तात्पुरत्या तंबूत उपचार करण्यात आले. इतरांना फुटपाथवर टाकण्यात आले. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांना टाके घातले.

१६२ लोकांचा मृत्यू :शेकडो पोलिस अधिकारी मंगळवारी सकाळी बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. तर पीडितांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले जात आहे. पश्चिम जावाचे गव्हर्नर रिडवान कामिल यांनी सांगितले की, सोमवारच्या भूकंपात किमान १६२ लोकांचा मृत्यू झाला, ज्यापैकी अनेक मुले होती आणि ३०० हून अधिक जखमी झाले. जखमी आणि मृतांचा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले. तर भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या इमारती कोसळल्या तसेच दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

विनाशकारी भूकंपांचा इतिहास : राजधानी जकार्ता येथे भूकंपाचे धक्के सुमारे 75 किमी (45 मैल) दूर जाणवले, असे स्थानिक माध्यमाने म्हटले आहे. किमान 2,200 घरांचे नुकसान झाले आणि 5,000 हून अधिक लोक विस्थापित झाले. इंडोनेशियामध्ये विनाशकारी भूकंपांचा इतिहास आहे. 2004 मध्ये, उत्तर इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details