महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इंडो-नेपाळ सीमा लवकरच होणार खुल्या - Indo-Nepal border open news

सुमारे दहा महिन्यांनंतर इंडो-नेपाळ सीमा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून पत्रव्यवहार सुरू आहेत. पत्रव्यहार झाल्यानंतर या सीमा सुरू करण्यात येणार आहेत.

सीमा
सीमा

By

Published : Jan 30, 2021, 5:21 PM IST

Updated : Jan 30, 2021, 6:36 PM IST

पाटणा (बिहार) - 2020 पासून बंद असलेल्या इंडो-नेपाळ सीमा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत नेपाळ सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात आले असून लवकरच सीमा सुरू होणार आहेत. यामध्ये त्रिवेणी, इनरवा, भिखनाठोरी व्यतिरिक्त अलावा भीसवा, वीरगंज सह अनेक सीमांचा समावेश आहे.

इंडो-नेपाळ बॉर्डर खुलने की संभावना

मार्च, 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडो-नेपाळ सीमा बंद करण्यात आल्या होत्या. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर काही अटी-शर्तींसह सीमा सुरू करण्याची सहमती दर्शवण्यात आली आहे. यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

27 जानेवारीला झाली होती बैठक

सीमावर्ती भागामध्ये भरणाऱ्या बाजारपेठावर भारत व नेपाळच्या लोकांचे उदरनिर्वाह अवलंबून होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील सीमा बंद करण्यात आल्या. यामुळे बाजार पेठांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. दोन्ही देशांमधील सीमा सुरू कराव्यात यासाठी अनेक नागरिकांनी आंदोलन केली होती. दरम्यान, 27 जानेवारीला त्रिवेणी सीमावर दोन्ही देशातील अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती.

हेही वाचा -गाजीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरीवरील इंटरनेट सेवा बंद

Last Updated : Jan 30, 2021, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details