महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Indigo flight in Bastar : नक्षलग्रस्त बस्तरमध्ये निमलष्करी दलाकरिता खास विमान सेवा, रजेवर जाणाऱ्या जवानांना मिळणार फायदा - Indigo flight in Bastar

निमलष्करी दलाचे जवान आता येथून थेट ( Bastar to fly directly Raipur ) रायपूर आणि दिल्लीला विमानाने जाऊ शकणार आहेत. या विमानातून फक्त सुरक्षा दल आणि नक्षल आघाडीवर तैनात अधिकारी प्रवास करू ( IndiGo  service for Paramilitary personnel  ) शकणार आहेत. विमानाच्या सुविधेने नक्षलग्रस्त भागात तैनात असलेले जवान सुखावले आहेत.

Indigo flight in Basta
निमलष्करी दलाकरिता खास विमान सेवा

By

Published : May 7, 2022, 10:30 PM IST

बस्तर - छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त ( Naxal affected area of ​​Chhattisgarh ) भाग असलेल्या बस्तरच्या भूमीवर पहिल्यांदाच इंडिगो एअरक्राफ्ट कंपनीचे ( Indigo flight in Bastar ) विमान सैनिकांना घेऊन जगदलपूर विमानतळावर पोहोचले आहे. विमानाचे आणि सैनिकांचे बस्तरच्या रहिवाशांनी स्वागत केले. बस्तरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना रजेवर जाण्याची सुविधा देण्यासाठी गृह मंत्रालयाने ( ministry of home affairs ) हा उपक्रम घेतला आहे.

जवान सुखावले- निमलष्करी दलाचे जवान आता येथून थेट ( Bastar to fly directly Raipur ) रायपूर आणि दिल्लीला विमानाने जाऊ शकणार आहेत. या विमानातून फक्त सुरक्षा दल आणि नक्षल आघाडीवर तैनात अधिकारी प्रवास करू ( IndiGo service for Paramilitary personnel ) शकणार आहेत. विमानाच्या सुविधेने नक्षलग्रस्त भागात तैनात असलेले जवान सुखावले आहेत. इंडिगोचे विमान आठवड्यातून तीन दिवस जगदलपूरहून रायपूर आणि दिल्लीसाठी उड्डाण करणार आहे. त्यामुळे सैनिकांना दिलेल्या सुट्यांमध्ये वेळ वाचणार आहे. तसेच सैनिकांना आरामात प्रवास करून आपापल्या घरी जाता येईल.

निमलष्करी दलाकरिता खास विमान सेवा

फक्त सैनिकांसाठी विमानाची सोय-बस्तरमध्ये तैनात असलेल्या जवानांनी सांगितले की, फक्त सैनिकांसाठीच विमाने असल्‍याने त्यांची खूप सोय होईल. जवानांना सुट्टीच्या दिवशीच घरी पोहोचता येणार आहे. त्यांचा प्रवासही सुखकर होईल. कॅम्पवरून जगदलपूर शहरात जाण्यासाठी आणि नंतर जगदलपूर ते रायपूर आणि त्यानंतर अर्धा दिवस सुट्टीचा दिवस रेल्वेने घरी जाण्याच्या प्रवासात घालवावा लागतो. आता जगदलपूर ते रायपूर आणि दिल्लीसाठी विमानसेवा सुरू झाली आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय सीमावर्ती ओजिशा राज्यातील मलकानगिरी आणि कोरापुटमध्येही बीएसएफचे जवान तैनात आहेत. अशा परिस्थितीत या सैनिकांच्या सोयीचा विचार करून गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details