महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंबा, चक्क २ लाख रुपये किलो.. बागेच्या सुरक्षेसाठी ९ श्वान आणि ६ सुरक्षारक्षक - जबलपूर आंबा न्यूज

जबलपूरमधील एका बागेत जपानी आंबा पिकविला जातो. हा आंबा किती खास आहे. याचा अंदाज तुम्ही आंब्याच्या किंमतीवरूनही लावू शकता. या जपानी आंब्याची किंमत प्रति किलो दोन लाख रुपये आहे. या आंब्यांच्या सुरक्षेसाठी 9 श्वान आणि 6 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

जबलपूर
जबलपूर

By

Published : Jun 18, 2021, 12:52 PM IST

Updated : Jun 18, 2021, 1:13 PM IST

जबलपूर - आंब्याला फळांचा राजा म्हणतात. 'आंबा' असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं तसं कठीण. देशात आब्यांचे वेगवगेळ प्रकार पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आंब्यांबद्दल सांगणार आहोत. हे आंबे जपानमध्ये आढळतात. या आंब्यांची किंमत प्रति किलो दोन लाख रुपये आहे. या आंब्याचा स्वाद घेण्यासाठी जपानला जाण्याची गरज नाही. कारण, हे आंबे तुम्हाला जबलपूरच्या बागेत सापडतील. आंब्याची वाढती मागणी लक्षात घेता, बागेच्या मालकाने या आंब्याच्या संरक्षणासाठी 9 श्वान आणि 6 सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. या सर्वांचा मासिक खर्च सुमारे 50 हजार रुपये येतो.

जबलपूरमधील बागेत पिकविला जातो जपानी आंबा

'ताईऔ नो तमगौ' नावाचा हा आंबा जपानमध्ये आढळतो. यालाच 'एग ऑफ दि सन' असेही म्हणतात. जबलपूरमधील संकल्प परिहार आणि रानी परिहार यांच्या बागेमध्ये इतर आंब्यांच्या झाडांसह या आंब्यांची झाडेही आहेत. गेल्या चार वर्षांपासून या 'ताईऔ नो तगमौ' झाडाला फळं येत आहेत. भारतातील सर्वात महागड्या आंबा 'ताईऔ नो तगमौ' ची वाढती मागणी लक्षात घेता या आंब्याच्या चोरीचा धोकाही वाढला आहे. यामुळे बागेच्या मालकाने या आंब्याच्या संरक्षणासाठी 9 कुत्री आणि 6 सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. या सर्वांचा मासिक खर्च सुमारे 50 हजार रुपये येतो. या आंब्याची किंमत प्रति किलो दोन लाख रुपये आहे.

श्वान करतात आंब्याची सुरक्षा...
आंब्यांच्या सुरक्षेसाठी 9 श्वान आणि 6 सुरक्षारक्षक तैनात

बागेत वेगवेगळ्या कोपऱ्यात 9 श्वान तैनात करण्यात आली आहेत. दोन श्वान पहारेकऱ्यासह संपूर्ण बागेत फिरतात. याशिवाय, पिंजऱ्यातील श्वान एखाद्या अज्ञात व्यक्तीला बागेत पाहिले की ते भुंकू लागतात. गेल्या वर्षीही चोरट्यांनी हे आंबे चोरून नेले होते. त्यामुळे यावर्षी त्यांची सुरक्षा आणखी वाढवावी लागली. या आंब्याच्या सुरक्षेसाठी दरमहा 50 रुपये खर्च येतो. सध्याच्या हवामानात हे आंबे पिकतात. सुमारे 1 किलोचा हा आंबा 15 जुलैच्या सुमारास संपूर्ण पिकून तयार होईल. तोपर्यंत याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती बागेचे मालक संकल्प परिहार यांनी दिली.

Last Updated : Jun 18, 2021, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details