नवी दिल्ली : चंद्रयान 3 ही इस्रोची मोहीम बुधवारी यशस्वी झाली आहे. भारताच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरुन इतिहास रचला आहे. दक्षिण ध्रुवावर चंद्रयान3 पाठवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे भारत विश्वगुरु बनण्याची सुरुवात अवकाशापासून झाली असं गौरवोद्गार विज्ञान, तंत्रज्ञान तथा अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काढले. गेल्या वर्षभरात केलेल्या कठीण मेहनतीचं हे फळ असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ विभाग सर्वांसाठी खुलं केल्याचाही फायदा झाला, असंही ते यावेळी म्हणाले.
जगानं स्विकारलं भारताचं यश :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतकालचं हे यश असल्याचं जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. सगळ्या जगानं भारताचं हे यश स्विकारलं आहे. चंद्रयान 3 मोहिमेत कोणतीही गुप्तता पाळण्यात आली नव्हती. चंद्रयान 3 मोहिमेत मिळालेल यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या अमृतकालचं लक्षण असल्याचंही जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत विश्वगुरु बनण्याचं सांगतात, त्याची सुरुवात अंतराळातून झाल्याचंही जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं.
चंद्रयान तीनचं यश काँग्रेसनं दिलं जवाहरलाल नेहरुंना :भारताची चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली आहे. मात्र चंद्रयान 3 मोहिमेचं यश काँग्रेसनं माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दिलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता, मी माध्यम प्रतिनिधींना त्यांनी बंगळुरुच्या केंद्रातून वार्तांकन करू शकले का, यावर त्यांनी नाही, असं उत्तर दिलं. हाच जवाहरलाल नेहरु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फरक असल्याचंही त्यांना मी सांगितल्याचं जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला अवकाशात प्रवेश दिला आहे. त्यामुळेच आज आमच्याकडं 150 पेक्षा जास्त स्टार्टअप्स असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.