महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Adani third richest person in the world गौतम अदानी झाले जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती, अरनॉल्ट यांना टाकले मागे

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आता जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती gautam adani now 3rd richest person in the world ठरले आहेत. 137.4 बिलियन डॉलर एवढ्या एकूण संपत्तीसह अदानी यांनी लुई व्हिटॉन चेअरमन अरनॉल्ट यांना मागे टाकले आहे. अदानी यांच्यापुढे आता फक्त एलोन मस्क आणि जेफ बेझोस हे दोघेच आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सच्या पहिल्या तीनमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Gautam Adani
Gautam Adani

By

Published : Aug 30, 2022, 9:57 AM IST

नवी दिल्लीब्लूमबर्ग बिलीनीअर्स इंडेक्सनुसार Bloomberg Billionaires Index नुसार अदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती gautam adani now 3rd richest person in the world ठरले आहेत. 137.4 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह, 60 वर्षीय अदानी यांनी लुई व्हिटॉनचे चेअरमन अरनॉल्ट यांच्या संपत्तीला मागे टाकले आहे. आता ते रँकिंगमध्ये उद्योगपती एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या मागे आहेत. भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी ब्लूमबर्गच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत.

ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी एकूण USD 91.9 अब्ज संपत्तीसह 11 व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सच्या पहिल्या तीनमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा निर्देशांक हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची क्रमवारी आहे.

एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती सध्या अनुक्रमे USD 251 अब्ज आणि USD 153 अब्ज इतकी आहे. अदानींची संपत्ती 137.4 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. अदानी समूहामध्ये ऊर्जा, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, खाणकाम आणि संसाधने, गॅस, संरक्षण आणि एरोस्पेस आणि विमानतळ या व्यवसायांसह 7 सार्वजनिक सूचीबद्ध संस्थांचा समावेश आहे. अदानी समूह हा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर भारतातील तिसरा सर्वात मोठा समूह आहे.

हेही वाचाAdani Lost 55k Cr, अदानींचे एका दिवसात 55 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका

ABOUT THE AUTHOR

...view details