नवी दिल्ली - कोरोना साथीमुळे देशात आर्थिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाईटरित्या प्रभावित झाल्यानंतर आता भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येत आहे. आता भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढत आहे. भारत सरकारने जारी केलेल्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) शी संबंधित नवी आकडेवारी हे दाखवते. आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येते की सध्या जगात ज्या देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे तो भारत आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (GDP) वार्षिक ८.७ टक्के वाढ नोंदवली आहे. जे चीन, अमेरिकेसारख्या मोठ्या आणि विकसनशील देशांपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, (2021-22) या आर्थिक वर्षात देशाचा (GDP 8.7) टक्के दराने वाढला आहे. गेल्या 22 वर्षांतील हा उच्चांक होता. इतकेच नाही तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. या काळात चीनची अर्थव्यवस्था 8.1%, ब्रिटनची अर्थव्यवस्था 7.4%, अमेरिका 5.7% आणि फ्रान्सची 7%, जर्मनी 2.8% आणि जपानची 1.6% वाढ झाली आहे.
(2021-22) या आर्थिक वर्षात सरकारने आर्थिक विकास दर 8.9 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जे अंदाजित आकडेवारीपेक्षा थोडे कमी होते. तथापि, असे असूनही, भारतासाठी ते खूप चांगले संकेत घेऊन आले. कारण सध्या जग कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामामुळे संकटाच्या मोठ्या टप्प्यातून जात आहे. यानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ होत आहे.