नवी दिल्ली -महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून ही लाट थोपवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय भारतासमोर आहे. देशात कोरोना लसीकरण चालू आहे. बर्याच लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. काही लोकांनी पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत 10 लाख लोकांना लस टोचवण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये 35 लाख लोकांना लस टोचवली आहे.
गेल्या 24 तासांत 35,19,987 लोकांना लस टोचवण्यात आली आहे. तर 10,15,95,147 लोकांना लस टोचवण्याच आली आहे. अवघ्या 85 दिवसात भारतानं ही कामगिरी केली असून अमेरिका आणि चीनसह जगातल्या इतर सर्व देशाना मागं टाकलं आहे.
गेल्या 24 तासांत देशात 1,52,879 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. केंद्रीय आरोग्य संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी रुग्णांची संख्या 1,52,879 वर पोहचली आहे. तर नव्या 839 मृत्यूंनंतर मृतांची संख्या 1,69,275 वर पोहचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 11,08,087 पर्यंत वाढल्यानंतर भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा कोरोना बाधित देश झाला आहे. दरम्यान 90,584 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,20,81,443 आहे. तर कोरोना रिकव्हरी दर 90.44 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण 1,20,81,443 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची संख्या 25,66,26,850 वर पोचली आहे.