टोरंटो (कॅनडा) - कॅनडाच्या टोरंटो शहरामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident in Toronto) व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलर यांच्या जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या माहितीनुसार, हा अपघात रविवार (दि. 13 मार्च)रोजी झाला. टोरंटोजवळ झालेल्या या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. (Indians students passed away In Toronto) तर, दोन जखमी आहेत. टोरंटोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे.
सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि मोंट्रेयल क्षेत्रातील आहे
हरप्रीत सिंह, जसपिंदर सिंह, करनपाल सिंह, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी अपघातातील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे मृत विद्यार्थी 21 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि मोंट्रेयल क्षेत्रातील असल्याचे सांगितले जात आहे.