हैदराबाद : राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडाने माणुसकीला काळीमा फासला आहे. या प्रकरणाचा खेळातील अनेक दिग्गजांनी निषेध केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनंतर आता महिला कुस्तीपटू बबिता फोगटनेही याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया ( Babita Fogat on Kanhaiya Lal Murder ) दिली आहे.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती बबिता ( Commonwealth Gold Medalist Babita ) हिने सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'हिंदू लाइव्ह्स मॅटर' मोहिमेचा एक भाग म्हणून ट्विट केले. बबिता म्हणाली की, माझ्या हिंदुस्थानातील हिंदूंचे जीवन महत्त्वाचे आहे. यापूर्वी इरफान पठाण म्हणाला होता की, अशी घटना घडवून आणणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची मानणारी असावी, हे योग्य नाही. अशा घटना माणुसकीला काळीमा फासतात.
बबिता फोगटचे ट्विट -
बबिता फोगट या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले ( Babita Fogat tweet on Udaipur incident ) की, 'हा माझा हिंदुस्थान आहे! इथे हिंदूंच्या जीव महत्त्वाचा आहे!!' या ट्विटमध्ये बबिताने हॅशटॅगसह 'हिंदू लाइव्ह्स मॅटर' #HinduLivesMatters देखील लिहिले आहे.
बबिताने आतापर्यंत देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय बबिताने 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. बबिताने 2012 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकही जिंकले आहे.