नवी दिल्ली : रविवारी होव्ह येथे भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला ( INDW vs ENGW ) संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. यातील पहिल्या सामन्यात स्मृती मंधाना (91), यस्तिका भाटिया (50) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ) (नाबाद 74) यांच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव ( Indian women team beat England by seven wickets ) केला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य -
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे भारतीय संघाने 42.3 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून स्मृती मंधानाने ( Smriti Mandhana half century ) 99 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 91 धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर यस्तिका भाटियानेही 47 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार 50 धावा केल्या. तसेच कर्णधार हरमनप्रीतने 94 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ( Fast bowler Jhulan Goswami ) तिच्या अंतिम आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रभावशाली कामगिरी केली. परंतु खालच्या फळीतील फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडच्या महिला संघाने सात बाद 227 धावा केल्या होत्या. भारताच्या 39 वर्षीय अनुभवी झुलनने 10 षटकांत केवळ 20 धावा देऊन एक विकेट घेतली. यादरम्यान तिने 42 डॉट बॉल टाकले (बॉलमध्ये धावा केल्या नाहीत). तिच्यासोबत दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी करत 33 धावांत दोन गडी बाद केले.
झुलन गोस्वामीची शानदार गोलंदाजी -