नवी दिल्ली:बीसीसीआयने सोमवारी यूएईत होणाऱ्या आशिया चषका 2022 ( Asia Cup 2022 ) साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा ( 15 member Indian team announced ) केली आहे. निवडलेल्या या संघात माजी कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार केएल राहुलचे देखील संघात पुनरागमन झाले आहे. त्याबरोबर भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. तसेच संघात काही युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे.
दीपक चहर स्टँडबाय -
दरम्यान, आशिया कप संघात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज दीपक चहर यांना स्टँडबाय म्हणून स्थान देण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज बुमराह ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेला मुकणार ( Jasprit Bumrah rested due to injury ) आहे. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज हर्षल पटेललाही आशिया कप संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
भारत सर्वाधिक वेळा चॅम्पियन -
भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेच्या 13 आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे आणि सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरला ( India most times champions ) आहे. याशिवाय संघाने तीनवेळा अंतिम फेरी गाठली, पण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ पाच वेळा चॅम्पियन बनला असून सहा वेळा उपविजेता ठरला आहे. पाकिस्तान संघाने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे. टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दारूण पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. 28 ऑगस्टला आशिया कपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.
पराभवाचा बदला घेण्याची भारताला संधी -