मुंबई : भारतीय शेअर बाजारात जुलै महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वात वेगवान वाढ ( Stock Market ) नोंदवली. जगभरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये ही सर्वाधिक वाढ आहे. शुक्रवारी (२९ जुलै) ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७१२.४६ अंकांनी म्हणजेच १.२५ टक्क्यांनी वाढून ५७,५७०.२५ अंकांवर बंद झाला. 25 एप्रिलनंतर सेन्सेक्सची ही सर्वोच्च पातळी आहे. सेन्सेक्सचा हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे.
चीनचा बाजार घसरला - यापूर्वी, 28 एप्रिल 2022 रोजी सेन्सेक्स 57,521.06 वर बंद झाला होता. जुलैमध्ये सेन्सेक्स 4,551.31 अंकांनी (8.58 टक्के) आणि निफ्टी 1,378 अंकांनी (8.73 टक्के) वधारला होता. दुसरीकडे, चीनचा मुख्य शेअर बाजार शांघाय कंपोझिट या काळात 4.28 टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे हाँगकाँगचा बाजार हँग सेंगमध्येही 7.79 टक्क्यांनी घसरला आहे. इतर आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी वाढला, तर जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स आणि हाँगकाँगचा हँग सेंग घसरला.