हैदराबाद -17 जुलै 1911 तिरुनलवेलीचे तत्कालिन जिल्हाधिकारी अॅश ( Trinunelvelli Collector Ash Killed By Vanchinathan ) आणि त्यांची पत्नी मॅरी कोडाईकनाल येथे शिकत असलेल्या आपल्या मुलांना भेटण्यासाठी जात होते. बोट मेलला जोडण्यासाठी त्यांचा विशेष प्रथम श्रेणीचा कोच मनियाची जंक्शनवर ( Maniachi Junction ) उभा होता. जिल्हाधिकाऱ्यांचे गार्ड पाणी आणण्यासाठी गेले. तेवढ्यात एका अनोळखी तरुणाने डब्यात घुसून अॅशवर गोळी झाडली आणि आपल्या पत्नीसोबत गप्पा मारणारा अॅश खाली कोसळला. त्यानंतर अॅशवर गोळी झाडणाऱ्या तरुणानानेही रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतागृहाजवळ जाऊन स्वत:वर ( Vanchinathan Suicide At Maniachi Junction ) गोळी झाडली. ब्रिटीश सरकारमधील प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट विल्यम डी एस्कॉर्ट अॅश वर गोळी झाडणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव होतं वंचीनाथन. भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांपेक्षा भारतीयांची संख्या जास्त होती. त्यामुळे वंचिनाथन सारख्या अनेक तरुणांना वाटायचं की, प्रत्येक भारतीयाने स्वतःचा जीव देण्यापूर्वी किमान एका इंग्रजांला गोळ्या घातल्यास, भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करता येईल. स्वातंत्र्यसैनिक सुब्रम्हन्यम शिवा आणि व्हीओ चिदंबरम पिल्लई यांच्या अटकेनंतर झालेल्या नेल्लई उठावा दरम्यान अॅशला मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अॅशला मारण्याची घेतली होती शपथ -
वंचिनाथन यांचे शालेय शिक्षण त्यांच्या मूळ गावी सेनगोटाई येथून झालं तर महाविद्यालयीन शिक्षण तिरुवनंतपुरम येथून झालं. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी वनरक्षकाची नोकरीही सोडली होती. त्यासाठी वंचिनाथन यांनी क्रांतीकारी मार्ग निवडला होता. तसेच वंचिनाथन यांनी व्हीव्हीएस अय्यर यांच्या भारत माता संस्थेमार्फत शस्त्र प्रशिक्षण घेतले होते. स्वातंत्र्याची आंदोलने जोर धरत असताना नुकताच तिरुनलवेलीचे कलेक्टर म्हणून नियुक्त झालेले अॅश, स्वातंत्र्यांची ही आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत होते. व्ही.ओ. चिदंबरम यांच्या स्टीम नेव्हिगेशन कंपनीवर आणलेली बंदी, हा त्यापैकीच एक प्रयत्न होता. त्यामुळे संतप्त झालेल्या वंचिनाथन यांनी अॅशला मारण्याची शपथ घेतली. वंचिनाथन हे घरी कमी आणि स्वातंत्र्यलढ्यात जास्त राहत होते. यादरम्यान त्यांची ओळख नीलकंदा ब्रह्मचारी यांच्याशी झाली. पुढे त्यांनी भारतमाता नावाची संघटना स्थापन केली. त्यांनी गुप्त बैठका घेतल्या आणि 9 मार्च रोजी विपिन चंद्रपालची सुटका करण्याची शपथ घेतली. वंचिनाथन यांनी 1907 ते 1911 दरम्यान ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला.
मृतदेह स्विकारण्यास वडिलांचा नकार -