नवी दिल्ली : Indin Railways: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असते. ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी काही नियमावली लावली जाते. कधी रेल्वे प्रवासात अनेक सवलती दिल्या जातात. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी सर्व सुविधा पुरविल्या जातात. अनेकदा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुविधा आणि रेल्वेशी संबंधित नियमांची माहिती असायला हवी. या नियमांची माहिती नसल्यास अनेक वेळा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या अशा सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या अंतर्गत तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये ( Travel without ticket ) चढू शकता.
कार्डद्वारे करा पेमेंट : रेल्वेच्या नवीन नियमावलीनुसार, जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असेल आणि तुमच्याकडे प्रवासाचे तिकीट नसेल, तर तुम्ही डेबिट कार्डद्वारे ट्रेनमध्ये भाडे किंवा दंड भरू शकता. म्हणजेच, जर तुमच्याकडे ट्रेनचे तिकीट नसेल, तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर तुम्ही कार्डद्वारे पैसे देऊन बनवलेले तिकीट देखील मिळवू शकता. अनेकवेळा प्रवाशांना कन्फर्म तिकीट न मिळाल्यास मनस्ताप सहन करावा लागतो. यातच भर म्हणून रेल्वेकडून मोठा दंड देखील ठोठावला जातो. आता मात्र तुम्ही हा दंड तुम्ही कार्डद्वारे भरू शकता.