नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची अत्याधुनिक ट्रेन 'वंदे भारत' मध्ये लवकरच विशेष प्रकारची सीट्स असणार ( Special seats in Vande Bharat train ) आहेत. या सीट्स देशात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसवल्या जाणार नाहीत तर त्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट असतील. या सीट्स तयार करण्याची जबाबदारी देशातील सर्वात जुनी स्टील कंपनी टाटा स्टील लिमिटेडची असल्याचे सांगण्यात येत ( Tata Steel responsible for manufacturing seats ) आहे. देशांतर्गत पोलाद कंपनी टाटा स्टील सप्टेंबरपासून या सीट्सचा पुरवठा सुरू करणार आहे. असे सांगितले जात आहे की, देशातील ही अशा प्रकारची पहिली सीट सिस्टम असेल. जाणून घ्या या सीट्समध्ये असे काय खास आहे की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
या ऑर्डरची किंमत सुमारे 145 कोटी रुपये -
वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांसाठी आधीच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आता या गाड्यांसोबत आणखी एका मोठ्या सुविधेची भर पडणार आहे. म्हणजेच वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या ट्रेनमध्ये देशातील पहिली अत्याधुनिक सीट मिळणार आहे. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य ( Tata Steel Vice President Debashish Bhattacharya ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कंपोझिट विभागाला वंदे भारत एक्स्प्रेसच्या 22 गाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. या ऑर्डरची किंमत सुमारे 145 कोटी रुपये ( 145 crore for order of seats )आहे.
देशातील पहिली अत्याधुनिक सीट्स वंदे भारत ट्रेन मिळणार आहे, या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले तर....
- खास डिझाइन केलेल्या या सीट्स आहेत.
- त्या 180 अंशांपर्यंत फिरू शकतात.
- यामध्ये विमानातील सीटसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
- या सीट्स फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर (FRP) च्या बनलेल्या आहेत.
- त्यांच्या देखभालीचा खर्चही खूप कमी असेल.
- प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठीही प्रभावी.
- भारतातील ट्रेनमधील सीटचा हा पहिलाच प्रकार आहे.