नवी दिल्ली :अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमधून न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला त्याच्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर विमानतळावर त्या व्यक्तीला पकडण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कथित मद्यधुंद विमान प्रवाशाची तक्रार दिल्ली पोलिसांना प्राप्त झाली आहे. अमेरिकन एअरलाइन्सने याप्रकरणी सहप्रवाशांचे जबाब नोंदवून आरोपीला कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी असेच एक प्रकरण समोर आले होत. त्या प्रकरणातही आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यामध्ये एका महिलेने आपल्या अंगावर लगवी केली असा आरोप केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला : दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की नागरी विमान वाहतूक कायद्याच्या अदखलपात्र गुन्ह्याखाली कायदेशीर कारवाई केली जात आहे. प्रवाशांच्या या वर्तनाबद्दल एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सहप्रवाशांनी लघवीबाबत कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. अदखलपात्र गुन्हा नागरी विमान नियमांतर्गत कायदेशीर कारवाई केली जात आहे. विमानतळाचे डीसीपी देवेश महेला यांनी सांगितले की, प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, आतापर्यंत कोणावरही लघवी केल्याच्या संदर्भात कोणताही ठोस पुरावा किंवा तक्रार मिळालेली नाही.