महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Stealth scorpene भारतीय नौदलाची वाढली ताकद, चौथी स्कॉर्पियन आयएनएस वेला मुंबईत होणार दाखल - scorpene class submarine in Mumbai

वेलापूर्वी एमडीएल कालवरी, खंडेरी आणि करंज या पाणबुड्या ( INS Vela in Mumbai) लाँच करण्यात आलेल्या आहेत. चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी कार्यरत झाल्याने अशी पाणबुडी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

चौथी स्कॉर्पियन आयएनएस वेला
चौथी स्कॉर्पियन आयएनएस वेला

By

Published : Nov 24, 2021, 4:34 PM IST

नवी दिल्ली- भारतीय नौदनाचा पी-71 या प्रकल्पाची चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी (fourth stealth scorpene) ही कार्यरत होणार आहे. ही आयएनएस वेला नावाने नौदलात कार्यान्वित होणार आहे. चालू महिन्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. कंपनीने ही पाणबुडी नौदलाकडे सोपविली होती.

चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी आयएनएस ही 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल (INS Vela in Mumbai) होणार आहे.

वेलापूर्वी एमडीएल कालवरी, खंडेरी आणि करंज या पाणबुड्या लाँच करण्यात आलेल्या आहेत. चौथी स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी कार्यरत झाल्याने अशी पाणबुडी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details