अमरावती INS Visakhapatnam responds to drone attack : समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. गुरुवारीही एका मालवाहू जहाजावर ड्रोननं हल्ला करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर भारतीय नौदलाला आपत्कालीन सतर्कतेचा इशारा (SOS) पाठवण्यात आला. सतर्कतेचा इशारा मिळताच भारतीलय नौदलानं INS विशाखापट्टणम ही विनाशिका युद्धनौका बचावकार्यासाठी पाठवली आहे, अशी माहिती भारतीय नौदलानं दिली आहे.
क्रू मेंबर्समध्ये 9 भारतीयांचा समावेश : एका निवेदनात नौदलानं म्हटलं की, भारतीय नौदल युद्धनौका 'INS विशाखापट्टणम' नं पोर्ट एडनच्या दक्षिणेला 60 नॉटिकल मैल अंतरावर व्यावसायिक जहाजावरील ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय. जहाजावर 22 क्रू मेंबर्स आहे. ज्यात नऊ भारतीयांचा समावेश आहे. बुधवारी रात्री 11.11 वाजता मार्शल बेटांवर व्यावसायिक जहाज 'एमव्ही जेन्को पिकार्डी'वर ड्रोन हल्ला झालाय.
नौदलाच्या युद्धनौकेची मदत :जहाजातून आपत्कालीन इशारा मिळताच भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं रात्री 12.30 वाजताच मदत पुरवलीय. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय नौदलानं आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेला समुद्रात बचाव कार्यासाठी तैनात केलं आहे.
हुथी बंडखोरांकडून हल्ले : भारतीय नौदलाच्या तज्ज्ञांनी जहाजाच्या खराब झालेल्या भागाची पाहणी केली. नंतर भारतीय नौदलाने पिकार्डी जहाजाला सुरक्षितपणे पुढे जाण्याची परवानगी दिली. गाझामधील इस्रायलच्या युद्धाच्या निषेधार्थ हुथी बंडखोर लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर हल्ले करत आहेत. विशेषतः इस्रायल तसंच अमेरिकन जहाजांवर हल्ले होत आहेत. अमेरिकेनंही याबाबत संरक्षणात्मक उपाययोजना केल्या आहेत. येमेनमध्ये हुथी बंडखोर सातत्यानं क्षेपणास्त्र, हवाई हल्ले करुन जहाजाचं नुकसान करत आहेत.
हे वाचलंत का :
- अरबी समुद्रात इस्रायलच्या जहाजावर ड्रोन हल्ला; जहाजावरील २० भारतीयांसह सर्व कर्मचारी सुखरूप, पाहा व्हिडिओ
- इंडिगोला 1.20 कोटी तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला 60 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?
- काय सांगता! प्रवाशानं चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून केला प्रवास